Breaking News

ऐतिहासिक कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवले; आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला! गत वैभव प्राप्त होईपर्यंत लढा सुरूच राहील - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

ऐतिहासिक कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवले; आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला! 

गत वैभव प्राप्त होईपर्यंत लढा सुरूच राहील - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ऐतिहासिक कारंजा टॉवर ची होत असलेली परवड व दुर्दशा आणि वयोवृद्धांची होत असलेली ससेहोलपट बघून त्यात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात यावे तसेच तीन बाजूने वयोवृद्धांसाठी वट्टे बांधावे किंवा सिमेंटचे बाकडे ठेवावे अशी मागणी नुकतीच दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी केली होती. ही बातमी प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले असून या बाकड्यांमुळे आता ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांची सोय झाली असून येथे बाकडे ठेवता क्षणी वयोवृद्ध येऊन बसत आनंद घेत आहेत. कारंजा टॉवरला परिपूर्ण करून शासन-प्रशासनाने हा आनंद द्विगुणीत करावा. असे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक बोलत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या तीन बाजूचे वट्टे जमीनदोस्त झाल्याने आबाल वृद्धांना बसण्यासाठी जागा राहिली नव्हती. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक कारंजा टॉवर समोर असलेल्या एका कापड दुकानाच्या पायऱ्यांवर बसत होते. दुपारनंतर येणारे सायं. दैनिके त्याच पायऱ्यांवर बसून वाचत होते. वयोवृद्धांचा हा नित्यक्रम पाहून कारंजा टॉवरच्या सभोवती पूर्वीसारखे वट्टे बांधणे किंवा सिमेंट बाकडे ठेवणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्याने एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी याविषयी निवेदन दिले होते.
याविषयीचे वृत्त दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी येथे सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले आहे. यामुळे आबालवृद्धांची सोय झाली आहे. आता येथे विनापरवाना अनधिकृतपणे लावण्यात येणारे डिजिटल बॅनर लावण्यास बंदी घालावी. त्याची अंमलबजावणी करावी. इमारतीच्या चारही बाजूंनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे. कचरा आणून टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच टॉवरच्या दक्षिण बाजूस जसे बाकडे ठेवण्यात आले तसेच पश्चिम व उत्तर बाजूस सुद्धा ठेवण्यात यावे. बंद करून ठेवलेले कारंजा टॉवर उघडून त्यात तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. कारंजा टॉवरच्या इमारती समोर लावण्यात आलेले पाण्याचे कारंजे सुद्धा सुरू करणे आवश्यक आहे.

*कारंजा टॉवरला गत वैभव पूर्ववत प्राप्त करून देईपर्यंत लढा सुरूच राहणार - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे*

शासन-प्रशासनाकडून कारंजा टॉवरला गत वैभव पुन्हा प्राप्त करून दिले जात नाही तोपर्यंत याविषयी लढा सुरूच राहील असे एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.



















==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत