रहनुमा कोचिंग क्लासेस चा शेख उमर ठरला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी
रहनुमा कोचिंग क्लासेस चा शेख उमर ठरला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी
मान्यवरांच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
बीड (एस.एम.न्युज़) - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी रहनुमा कोचिंग क्लासेस येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यात वर्षभरातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार शेख उमर शाकेर या विद्यार्थ्याने पटकावला. त्याला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बीड शहरातील जमजम कॉलनी येथे असलेल्या रहनुमा कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची वर्षभरातील उपस्थिती तसेच त्याने वर्षभरात वेगवेगळ्या सराव परीक्षेत मिळविलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून जो विद्यार्थी यात अव्वल ठरेल त्याला दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात येणाऱ्या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाते. यावेळी हा पुरस्कार शेख उमर शाकेर या दहावीच्या विद्यार्थ्याने हा पुरस्कार पटकावला. त्याला बलभीम महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमुख पाहुणे सुरवसे सर, मेड एक्सिलेन्स क्लासेसचे संचालक विकार सर, इमरान मोमीन सर आणि रहमान सर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रहनुमा कोचिंग क्लासेस चे मुजाहेद सर, सहशिक्षक शफिक सर, हलीमा मिस, अवद सर, शाहरुख सर, खतिजा मिस, अमिना मिस यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात उच्च शिक्षण घेऊन चांगले जबाबदार नागरिक बनावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा