Breaking News

रमज़ान महिन्यात पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, स्वच्छता व्यवस्थित ठेवा अन्यथा मौलाना आझाद युवा मंच कडक आंदोलन करेल - अरफ़ात खान


रमज़ान महिन्यात पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, स्वच्छता व्यवस्थित ठेवा

अन्यथा मौलाना आझाद युवा मंच कडक आंदोलन करेल - अरफ़ात खान

बीड (एस.एम.न्युज़) - लवकरच येऊ घातलेल्या पवित्र रमज़ान महिन्यात पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासह शहर स्वच्छता व्यवस्थित ठेवावी अन्यथा मौलाना आझाद युवा मंच लोकशाही मार्गाने कडक व तीव्र आंदोलन करेल. असा इशारा मंचचे मराठवाडा अध्यक्ष अरफ़ात खान यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरातील पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा आणि स्वच्छता या प्रत्येक नागरिकाला जीवन जगताना अत्यावश्यक असलेल्या बाबींकडे बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाचे म्हणावे तसे लक्ष नाही. यामुळे शहरात कुठे ०८ दिवसाआड तर कुठे १५ ते २५ दिवसाआड नळांना पाणी सोडले जाते. विद्युत पुरवठा कमी जास्त प्रमाणात वारंवार खंडित होतो. शहर स्वच्छतेची तर पूर्णतः वाताहात झाली आहे. संपूर्ण बीड शहरात गल्लीबोळांपासून ते मुख्य रस्त्यांवर सुद्धा जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात ते बीड नगर परिषदेकडून नियमितपणे उचलले जात नाही. शिवाय नाल्या दोन-दोन, चार-चार महिने काढल्या जात नाहीत. काढल्या तर काढलेली घाण वेळेवर उचलली जात नाही म्हणून ती घाण पुन्हा नाल्यांमध्ये जाते. असे सर्व भयानक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरात हमखासपणे दिसून येत आहेत. अशा अवस्थेमध्ये आता लवकरच इस्लाम धर्माचा पवित्र व महत्त्वपूर्ण असा रमज़ानचा महिना सुरू होणार आहे. यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रमज़ानचे रोजे धरतात म्हणून रोजेदारांना पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा आणि स्वच्छता वेळच्या वेळी खंड न पडता मिळायलाच हवी. जर या सेवांमध्ये कुचराई करण्यात आली तर बीड नगर परिषदेसह महावितरण कंपनी विरोधात लोकशाही मार्गाने मौलाना आझाद युवा मंच तीव्र आंदोलन छेडेल असा खणखणीत इशारा मंचचे मराठवाडा अध्यक्ष अरफ़ात खान यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत