Breaking News

३३ वर्षानंतर नागपुरात १०वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी पदाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

३३ वर्षानंतर नागपुरात १०वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी पदाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे तब्बल ३३ वर्षानंतर १०वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन होत आहे. यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे व अधिक माहितीसाठी पदाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद", सोलापूर तर्फे आयोजित
दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी  साहित्य संमेलन १९ आणि २० एप्रिल २०२५ ला नागपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष डॉ. अज़ीज़ नदाफ, सचिव अय्यूब नल्लामंदू आणि संयोजक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  जाहिर केले आहे.
यासाठी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड, स्मरणिका प्रकाशन व इतर कामे व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्याचे  ठरल्याची माहिती देण्यात आली आहे.
संमेलन अखिल भारतीय स्तरावर  संपन्न व्हावे, यासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद यांच्या मुख्य आयोजकांसह भारतीय मुस्लीम परिषद, फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच, छवी पब्लिकेशन्स, हिंदी साहित्य परिषद या सर्वांचे सहकार्य  घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती ही देण्यात आली आहे. संमेलन व्यवस्थित पार पडावे म्हणून नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद सर्व साहित्यिकांशी संपर्क साधत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अगोदर प्रा. जावेद पाशा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे साहित्य संमेलन अज़ीज़ नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे १९९२ साली संपन्न झाले होते. आता नागपुरला पुन्हा दहावे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा  मान मिळाला आहे.
या संमेलनासाठी  नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी मुख्यसंयोजक प्रा.जावेद पाशा कुरेशी, नागपूर  - 8459563489/ 9422154223, डॉ. इ.जा.तांबोळी, उपाध्यक्ष. 9890919118 अय्यूब अब्दुल लतीफ नल्लामंदू  सचिव 9766819981. हसीब नदाफ खजीनदार 93266264088 यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत