प्रशासनाला कारंजा टॉवरची दैनावस्था दुर करावीच लागेल! आता जनतेतही निर्माण झाली जागरूकता - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे
प्रशासनाला कारंजा टॉवरची दैनावस्था दुर करावीच लागेल!
आता जनतेतही निर्माण झाली जागरूकता - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे
बीड (एस.एम.न्युज़) - कारंजा टॉवर साठी आता जनताही सरसावली असून एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदनानंतर कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले. हे पाहून कारंजा, अजीजपुरा आणि खंदक भागातील अनेक नागरिकांनी सुद्धा जागरूकता दाखवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. यावरून ऐतिहासिक ठेवा असलेल्या कारंजा टॉवरला गतवैभव पुन्हा प्राप्त होणार असे कारंजा टॉवर च्या प्रश्नांविषयी लक्ष वेधणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.
दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी कारंजा टॉवर विषयी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर याविषयी १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्थानिक तसेच विभागीय वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या. याचाच परिणाम म्हणून कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले आहे. हे पाहून कारंजा परिसरासह अजीजपुरा आणि खंदक येथील नागरिकांचाही हुरूप वाढल्याने त्यांनी एकत्रित येऊन कारंजा टॉवर विषयी जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषदेत निवेदन दिल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. यामुळे कारंजा टॉवर विषयी आता सर्वसामान्य जनतेतही जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे कारंजा टॉवरचा लढा आता खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतला असल्याचे दिसून येत आहे. जनरेटा वाढल्याने आता बीड नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनालाही विशेष लक्ष देऊन कारंजा टॉवरची दैनावस्था दूर करावीच लागेल. जोपर्यंत कारंजा टॉवरचे नूतनीकरण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही व लढा सुरूच ठेवणार असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा