शासनाने राशन दुकानांवर पाठविलेली ज्वारी माणसांसाठी की जनावरांसाठी?
शासनाने राशन दुकानांवर पाठविलेली ज्वारी माणसांसाठी की जनावरांसाठी?
बीड (एस.एम.न्युज़) - शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून राशन दुकानांवर गव्हा ऐवजी ज्वारी देण्याचा निर्णय घेतला मात्र ही ज्वारी अत्यंत निकृष्ट किडकी, धुळ, फुफाटा, कचरा मिश्रित आहे. ही ज्वारी पाहता शासनाने ती माणसांसाठीच पाठविली की जनावरांसाठी? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित केले जात आहे.
शासन गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या योजनांबाबत कधी कोणता निर्णय घेईल? कधी काय करेल? याचा नेम नसतो. अशाच प्रकारे शासनाने नुकतेच राशन दुकानांवरून रेशन कार्ड धारकांसाठी पाठविण्यात येणाऱ्या गव्हा ऐवजी ज्वारी पाठविण्याचा निर्णय घेतला परंतु ही ज्वारी एवढी खराब आहे की विचारता सोय नाही. आकाराने बारीक असलेल्या या ज्वारीला मोठ्या प्रमाणात कीड लागलेली आहे तसेच त्यात मोठ्या प्रमाणात धूळ, फुफाटा आणि कचरा सुद्धा आहे. विशेष म्हणजे ज्वारीतील या फुपाट्यामुळे माप देणारा आणि ज्वारी घेणारा दोघांचेही अंग मोठ्या प्रमाणात खाजवू लागले आहे. एकीकडे खराब ज्वारीमुळे अगोदरच रेशन कार्डधारकांना मनस्ताप होऊ लागलाय तर दुसरीकडे अंग खाजवण्याचा त्रास सुद्धा होतोय. शासन जेव्हा अन्नधान्य खरेदी करून ठेवते, तेव्हा ते वेळीच वाटप का करण्यात येत नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शासकीय गोदामांमध्ये खरेदी करून ठेवलेले अन्नधान्य वर्षानुवर्षे पडीक ठेवले जातात. जेव्हा ते खराब होतात तेव्हा सर्वसामान्य गोरगरीब रेशन कार्ड धारकांसाठी राशन दुकानांवरून पाठवून देण्यात येते. सर्वसामान्य गोरगरीब माणसं नसतात का? का शासन अशा प्रकारे खराब अन्नधान्य पाठवून गोरगरिबांची चेष्टा करते. का अशी परीक्षा घेण्यात येते? असे उद्विग्न प्रश्न उपस्थित केले जात आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा