Breaking News

एस.के.पी. ग्रुप आणि शुजा स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित समीर काझी चषक बी.एफ.एल.चे थाटात उद्घाटन


एस.के.पी. ग्रुप आणि शुजा स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित समीर काझी चषक बी.एफ.एल.चे थाटात उद्घाटन

बीड (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे एस.के.पी. ग्रुप आणि शुजा स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित समीर काझी चषक बी.एफ.एल. सीजन चार 2025 चे थाटात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
एस.के.पी. ग्रुप आणि शुजा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समीर काझी चषक बीएफएल सीजन चार २०२५ चे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा उद्योगपती शेख निजाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ, ॲड. सय्यद खाजा, प्रा. आमेर सलीम, अय्युब खान, जावेद काझी, शेख इम्रान यांची प्रमुख उपस्थिती होती.
या चषकासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये ६ संघांचा समावेश आहे. चषकातील सर्व सामने हे संध्याकाळी ०६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दररोज सामने रंगणार आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रात्रीचे सामने आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ५० हजाराचे प्रथम पारितोषिक एस.के. पी. ग्रुपचे सय्यद शाकेर यांच्या तर्फे तर रणवीर पंडित यांच्यातर्फे २५००० चे द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे. सय्यद कय्युम जागीरदार यांच्याकडून पाच हजाराचा मालिकावीर पुरस्कार, किशोर कागदे यांच्यातर्फे उत्कृष्ट डिफेंडर दोन हजाराचे, आवेज इनामदार यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलकीपर दोन हजाराचे, डॉ. इमरान खान यांच्यातर्फे उत्कृष्ट मिड फिल्डर दोन हजाराचे, जिल्हाध्यक्ष एस.डी.पी.आय.यांच्यातर्फे उत्कृष्ट फॉरवर्ड दोन हजाराचे पारितोषिके देण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक सामन्यात सामनावीराचे सन्मान चिन्ह ॲड. सनाउल्लाह इनामदार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन इमरान शेख, अफरोज सर, जमील सर, शेख एजाज, अब्दुल खदीर, इरशाद खान, इरफान बागे आणि शुजा स्पोर्टिंग क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मिळून केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत