Breaking News

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग आलाय जोमात बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासन मात्र अजूनही कोमात


ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग आलाय जोमात

बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासन मात्र अजूनही कोमात

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ऐतिहासिक कारंजा टॉवर च्या दुर्दशेवर प्रथम निवेदन आणि नंतर बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकल्यावर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग जोमाने कामाला लागला आहे. निवेदन देऊन १० दिवस उलटले तरी बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाकडून कारंजा टॉवर चे कुठलेच काम सुरू करण्यात न आल्याने ही दोन्ही कार्यालये अजूनही कोमातच असल्याचे दिसत आहे. दोन्ही कार्यालयांची अशीच अवस्था राहिली तर बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरची दैना दूर कशी होईल? आणि कधी? असे प्रश्न एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी उपस्थित केले आहेत.
ऐतिहासिक कारंजा टॉवर विषयी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिलेले निवेदन, त्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या बातम्या बघून आता जनतेत कारंजा टॉवरच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. याचाच परिपाक म्हणून टॉवर लगत सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले आहे. त्यावर आता लहान-मोठे आणि वयोवृद्ध नागरिक बसून आनंद घेत आहेत. शिवाय टॉवरच्या इमारतीसमोर लावण्यात येणारे भले मोठे अगडबंब बॅनर चे फ्रेम काढून टाकण्यात आले आहे. तसेच १० वर्षांपूर्वी कारंजा टॉवर समोर तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या कारंज्याच्या हौदेतील प्रचंड गाळ, घाण, केरकचरा ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत तरुणांनी श्रमदान करून काढला आणि हौदाची साफसफाई केली. आता टॉवरच्या पश्चिम आणि उत्तर बाजूस सिमेंटचे बाकडे टाकणे, पाण्याचे कारंजे सुरू करणे, दहा वर्षांपूर्वी टॉवरच्या चारही बाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून सुरू करणे, बंद पडलेल्या तिन्ही बाजूच्या घड्याळी सुरू करणे, टॉवरच्या इमारतीला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या दोन्ही मोठ्या झाडांच्या फांद्या छाटणे, टॉवरच्या इमारतीला आतून बाहेरून रंगरंगोटी करणे आदी कामे करणे आवश्यक आहे. कारंजा टॉवर विषयी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग जोमात आलेला असताना दुसरीकडे मात्र बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासन अजूनही कोमातच असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही कार्यालयांची अशीच अवस्था राहिली तर बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरची दैना दूर कशी होईल? आणि कधी? असे प्रश्न एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी उपस्थित केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत