अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड
बीड (एस.एम.न्युज़) - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सा. बीड प्रहार चे संपादक अशोक होळकर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन असा होत असून पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या जात आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य संपूर्ण राज्यभरात असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ काम करीत आहे. केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीश बुलबुले यांच्या सुचनेवरून त्यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या ध्येय धोरणानुसार काम करून संघटना वाढीसाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याच्या सूचना निवड पत्रातून देण्यात आल्या आहेत. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. निवडीनंतर अशोक होळकर यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा