Breaking News

दोन मोठ्या झाडांच्या फांद्यांमुळे ऐतिहासिक कारंजा टॉवरला धोका बीड नगर परिषद साध्या फांद्या छाटू शकत नाही का? - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे


दोन मोठ्या झाडांच्या फांद्यांमुळे ऐतिहासिक कारंजा टॉवरला धोका

बीड नगर परिषद साध्या फांद्या छाटू शकत नाही का? - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

बीड (प्रतिनिधी) - शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवर ला जवळच असलेल्या दोन मोठ्या झाडांच्या फांद्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. असे असताना देखील त्या फांद्या छाटल्या जात नाहीयेत. म्हणून बीड नगर परिषद साध्या फांद्या छाटू शकत नाहीत का? असा उद्विग्न प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी उपस्थित केला आहे.
ऐतिहासिक कारंजा टॉवरला बीड नगर परिषदेच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे, हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. ही ऐतिहासिक वास्तू दुर्दशेत अडकली आहे. मात्र याकडे प्रशासकीय स्तरावर बघितलेच जात नसल्याने ही ऐतिहासिक वास्तू दारिद्र्याच्या फेऱ्यात अडकली आहे. म्हणून याविषयी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवेदन ही देण्यात आले आहे. तसेच तेव्हापासून आतापर्यंत प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने बातम्याही प्रकाशित केल्या जात आहे. तरीसुद्धा प्रशासनिक स्तरावर दखल घेतली जात नाही. हे चित्र पाहता कारंजा टॉवर परिसराजवळ तसेच अजिजपुरा आणि खंदक येथील ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येत तरुणांना सोबत घेऊन कारंजा टॉवरच्या आवारातील सर्व घाण कचरा उचलून स्वच्छता केली. पाण्याच्या फवाऱ्यासाठी लावण्यात आलेल्या कारंजाच्या हौदालाही साफसूफ केले. कारंजा टॉवरचे सर्व आवार आणि हौद पाण्याने धुवून काढण्यात आले. जाहिरातीच्या डिजिटल फलकासाठी लावण्यात आलेले लोखंडी फ्रेम काढण्यात आले. नागरिक स्वतः पुढे येऊन करत असलेले हे कार्य सुद्धा प्रशासनाला दिसत नाही असे वाटते. म्हणूनच की काय प्रशासनाकडून अजूनही कारंजा टॉवरसाठी आवश्यक असलेली कामे केली जात नाहीत. जवळच असलेल्या दोन मोठ्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात कारंजा टॉवरला चिटकल्या असून त्याच्या दाबाने तसेच वारा सुटल्यास होणाऱ्या घर्षणाने कारंजा टॉवरच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. परंतु बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनालाही याच्याशी काहीही देणे घेणे असल्याचे दिसत नाही. येथील दोन्ही झाडांच्या कारंजावर लोंबकळणाऱ्या फांद्या छाटणी आवश्यक असताना त्या छाटल्या जात नाही. म्हणून मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी बीड नगर परिषद या फांद्या सुद्धा छाटू शकत नाही का? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित केला आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत