२८ ऑगस्ट २०१५ च्या निकषाप्रमाणे संच मान्यता लागू करा
महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना (जि.प) बीड ची शिक्षण आयुक्तांकडे मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत शासनाने २८ ऑगस्ट २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार व निकषाप्रमाणे संच मान्यता लागू करण्यात यावी तसेच शासनाने या शासन निर्णयाला बगल देत १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयाला रद्द करावे अशा मागण्या अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना (जि.प) बीड कडून शिक्षण आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,१५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार जी संच मान्यता लादण्यात आली आहे. ती जाचक व अन्यायकारक आहे. ह्या संचमान्यतेमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. बहुतेक शाळा बंद पडत आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच शाळा बंद होणार आहेत. ६वी ते ८वी वर्गासाठी विद्यार्थ्यांना शुन्य (०) शिक्षक म्हणजे एकही शिक्षक मिळणार नाही. अर्थात ती शाळा आपोआप बंद होणार आहे. शहरी भागातही खुप शाळा असल्यामुळे एक ही विद्यार्थी मिळणे कठीण आहे. या शासन निर्णयानुसार तर पद कायम ठेवण्यासाठी दुप्पट विद्यार्थी पाहिजे. मागील शासन निर्णयानुसार ६वी ते ८वी वर्गात ३७ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक पदवीधर बसत होते. परंतु आताच्या नवीन शासन निर्णयानुसार तीन पदासाठी ७१ विद्यार्थी असणे आवश्यक आहे. जे शक्यच नाही. संदर्भीय शासन निर्णय हा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चा विरोध करणारा आहे. म्हणून हा शासन निर्णय रद्द करावा. तसेच २८ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय हा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ ला अनुसरुन असल्यामुळे ह्याच कायद्यानुसार व २८ ऑगस्ट २०१५ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार संच मान्यता कायम ठेवण्यात यावी. अशा मागण्या अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना (जि.प) बीड चे कार्याध्यक्ष उस्मान खान, जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद आणि शेख इम्रान यांनी शिक्षण आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
===============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा