लोकंहो, आमदार-खासदारांच्या बातम्या आलेली वृत्तपत्रे रद्दीत टाकू नका! सांभाळून ठेवा कालांतराने कामी येतील - एस.एम.युसूफ़
लोकंहो, आमदार-खासदारांच्या बातम्या आलेली वृत्तपत्रे रद्दीत टाकू नका!
सांभाळून ठेवा कालांतराने कामी येतील - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - नवनिर्वाचित आमदार-खासदार अलीकडे बरीच विकास कामांची पत्रके वृत्तपत्रातून प्रसिद्धीसाठी देत आहेत. त्यांच्या बातम्या प्रकाशित झालेली वृत्तपत्रे वाचल्यानंतर लोकांनी कृपया रद्दीत टाकू नये. ती संग्रही ठेवावी. पुढे चालून ती कामी येणार आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार हे पहिल्या टर्म सारखेच दुसऱ्या टर्म मध्येही विविध विकास कामांची अंदाजित पत्रके प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित करण्यासाठी देत आहेत. ज्यात प्रामुख्याने बिंदुसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाच्या बातम्यांचाही समावेश आहे. गेल्या टर्म वेळी सुद्धा आमदारांनी या पुलाविषयी अशीच मोठी पत्रकबाजी केली होती परंतु त्यांचे पहिल्या टर्मचे पाच वर्षे संपले तरीही या पुलाचा मुहूर्त काही लागला नाही. आणि अद्याप पर्यंतही हा प्रश्न आहे तसाच पडून आहे.
याशिवाय पहिल्यांदा निवडून येणारे बीडचे खासदार सुद्धा अनेक विकास कामांसाठी विविध पत्रके काढत आहेत. ज्यात प्रामुख्याने अहेमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण होणार, इमामपूर रस्त्यावर रेल्वे थांबा मंजूर होणार, उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे मार्ग होणार, सोलापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गही होणार, बीडला रेल्वे जंक्शन होणार इत्यादी दावे करीत आहेत. निवडून आलेल्या आपल्या बीडच्या या लोकप्रतिनिधींचे असे दावे केलेल्या बातम्या प्रकाशित झालेली वृत्तपत्रे लोकांनी सांभाळून ठेवावीत. अशा वृत्तपत्रांना रद्दीत टाकू नये. कारण पुढे काही वर्षांनी आमदार-खासदार करत असलेले दावे आणि विकास कामे पूर्णत्वास आली नाही तर पुढच्या निवडणुकीत ही वृत्तपत्रे दाखवून निदान आमदार-खासदारांना जाब विचारता येईल.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा