Breaking News

ऐतिहासिक कारंजा टॉवर मध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू करा तीन बाजूने वयोवृद्धांसाठी वट्टे बांधा किंवा सिमेंटचे बाकडे ठेवा - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे


ऐतिहासिक कारंजा टॉवर मध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू करा

तीन बाजूने वयोवृद्धांसाठी वट्टे बांधा किंवा सिमेंटचे बाकडे ठेवा - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

बीड (एस.एम.न्युज़) - शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवर मध्ये बीड नगर परिषदेचे तक्रार निवारण केंद्र सुरू करावे आणि तीन बाजूने वयोवृद्धांसाठी वट्टे बांधावे किंवा सिमेंटचे बाकडे ठेवावे अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराच्या मध्यभागी असलेले कारंजा टॉवर ही बीड शहराची ऐतिहासिक ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून बीड नगर परिषदेच्या अनास्थेमुळे या ऐतिहासिक इमारतीला अवकळा आली आहे. दहा वर्षांपूर्वी या ऐतिहासिक कारंजा टॉवर बद्दल प्रसिद्धी माध्यमातून लेख लिहिल्यानंतर याचे नूतनीकरण करण्यात आले खरे मात्र त्याला आता दहा वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा नूतनीकरण परिपूर्ण करण्यात आलेले नाही. जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर करण्यात आले तसेच ऐतिहासिक इमारती समोर पाण्याचे कारंजे लावण्यात आले मात्र केलेल्या प्लास्टरवर रंगरंगोटी करण्याचे काम दहा वर्षे उलटूनही करण्यात आले नाही. नूतनीकरणानंतर लावण्यात आलेले पाण्याचे कारंजे अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. कारंजा टॉवर समोर अनधिकृतपणे मोठमोठे डिजिटल बॅनर्स लावण्यात येतात. काही नतदृष्ट या ऐतिहासिक इमारती समोर कचरा फेकून जातात. यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो. या सर्व कारणांमुळे या ऐतिहासिक कारंजा टॉवर च्या इमारतीची गरिमा धुळीस मिळत आहे. याचे अवमूल्यन होत आहे. या सर्व अवस्थेतून कारंजा टॉवरची सुटका करण्यासाठी, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कारंजा टॉवरच्या इमारतीमध्ये बीड नगर परिषदेचे तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. शहरात राहणाऱ्या शहरवासीयांना अनेक समस्या असतात त्या दूर करण्याकरिता बीड शहरवासीयांच्या सोयीसाठी येथे तक्रार निवारण केंद्र सुरू केल्यास बीड नगर परिषदेकडून ऐतिहासिक कारंजा टॉवरची दररोज साफसफाई करण्यात येईल तसेच परिसर ही स्वच्छ ठेवले जाऊ शकेल. शिवाय नूतनीकरणाअगोदर कारंजा टॉवरच्या इमारती लगत आबालवृद्धांसाठी उंच वट्टे बांधलेले होते मात्र बीड नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे ते वट्टे जमीनदोस्त झाले होते. नूतनीकरणानंतर ते वट्टे पुन्हा बांधण्यात आले नाही. तेव्हा इमारतीच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण बाजूने आबालवृद्धांसाठी वट्टे बांधण्यात यावे किंवा सिमेंटचे बाकडे ठेवण्यात यावे. पर्यायाने कारंजा टॉवरची होत असलेली दुर्दशा थांबवावी. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत