एस.एम.युसूफ़ यांनी महेदवीया दायरा कब्रस्तान च्या समस्या मांडल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रदेश सल्लागार ॲड. उस्मान मोरवे यांनी दिले ठोस आश्वासन
एस.एम.युसूफ़ यांनी महेदवीया दायरा कब्रस्तान च्या समस्या मांडल्या
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रदेश सल्लागार ॲड. उस्मान मोरवे यांनी दिले ठोस आश्वासन
बीड (एस.ए.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेले महेदवीया दायरा कब्रस्तान च्या अनेक समस्या आणि प्रश्न एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक, मुक्तपत्रकार तथा महेदवीया समाजाचे विश्वस्त एस.एम.युसूफ़ यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रदेश सल्लागार ॲड. उस्मान मोरवे यांच्यासमोर मांडल्या. मोरवे यांनी सर्व बाबी, समस्या आणि प्रश्न ऐकून यावर निश्चितपणे कार्य करू असे ठोस आश्वासन दिले.
ॲड. उस्मान मोरवे हे उस्मानाबादहून बीडला आले होते. ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रदेश सल्लागार असून महेदवीया समाजाचे विश्वस्त देखील आहेत. बीड येथील मोमीनपुरा भागात असलेले ४५० वर्षांचे ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तान गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेले आहे. येथे सर्वप्रथम कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. मात्र बीडच्या महेदवीया जमातकडे यासाठी आवश्यक निधी नसल्याने कब्रस्तानला मोठी अवकळा आली आहे. याकरिता युसूफ़ हे २०१४ पासून सतत संघर्षरत आहेत परंतु या संघर्षाला अजूनही प्रत्यक्ष कार्याचे फळ मिळालेले नाही. ही बाब ॲड. मोरवे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बीड येथे येऊन युसूफ़ यांची भेट घेत महेदवीया दायरा कब्रस्तान विषयी सखोल माहिती घेतली. तसेच मुस्लीम महेदवीया समाजाच्या समस्या, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विविध शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे प्रश्न, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी बाबत देखील सखोल चर्चा केली. तसेच एकत्रितरित्या समाजासाठी निश्चितपणे चांगले कार्य करू असे म्हटले. यावर एस.एम.युसूफ़ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या बैठकीत सोलापूर येथील मुश्ताक बोराटे यांची उपस्थिती होती.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा