Breaking News

आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्यावरील विद्युत रोहित्र आणि खांबांचे चर काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत

आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्यावरील विद्युत रोहित्र आणि खांबांचे चर काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत

डीपी रोड पार्किंग आणि गतिरोधकांनी व्यापला





एखादा मोठा अपघात झाल्यास चरांचे काँक्रिटीकरण होणार काय?
बंदी असूनही गतिरोधकासाठी सिमेंट काँक्रीट चा आलाय ऊत
अनाधिकृत पार्किंगने व्यापलाय डीपी रोडचा रुंद रस्ता
बीड नगर परिषद झालीय शेळपट तर जिल्हा प्रशासनही झालंय निबर गट
वैतागले बीडकर; दाद मागावी कुणाकडे? फिर्याद द्यावी कुणाला?
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील आसेफ़नगरच्या मुख्य डीपी रस्त्यावरील विद्युत रोहित्र आणि खांबांचे चर जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे येथे एखादा मोठा अपघात झाल्यावरच चरांचे काँक्रिटीकरण होणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. येथील चरांचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक असताना ते करण्यात येत नाहीये मात्र याच रस्त्यावर तसेच शहरात जिथे नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत, त्या रस्त्यांवर सर्रासपणे अत्यंत तापदायक आणि त्रासदायक असे सिमेंट काँक्रीटचे पूर्ण लांबीचे किंवा अर्धवट गतिरोधक टाकण्यात येत आहे. आसेफ़नगर मध्ये तयार करण्यात आलेला हा डीपी रस्ताही याला अपवाद राहिला नाही. येथेही गतीरोधकांचा अक्षरशः सुळसुळाट करून टाकण्यात आला आहे. याचे कुठलेही सोयरसुतक बीड नगर परिषद तसेच जिल्हा प्रशासनाला असल्याचे दिसत नाही. तसेच अनावश्यक गतिरोधके टाकण्याकरिता सिमेंट काँक्रीट चा भरमसाठ ऊत आल्याचे दिसत आहे. परंतु विद्युत रोहित्र आणि विद्युत खांबासाठी सोडलेले चर भरण्याकरिता सिमेंट काँक्रीट ची वाणवा दिसून येत आहे. आसेफ़नगरचा रुंद करण्यात आलेला हा रस्ता एकूण रुंदी पैकी जवळपास १५ ते २० फूट अनाधिकृत पार्किंगने व्यापला आहे. तरीही बीड नगर परिषद एखाद्या शेळपटासारखी तर जिल्हा प्रशासन निबर गट कोडग्या सारखा वागत असल्याचा अनुभव बीड शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. यामुळे बीडकर अक्षरशः वैतागले असून त्यांनी दाद मागावी कुणाकडे? फिर्याद द्यावी कुणाला? अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आसेफ़नगर चा हा मुख्य रस्ता व्हावा म्हणून गेल्या १० वर्षांपासून बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाला अनेक निवेदने दिलेली होती तसेच एक नाही तर दोनदा या रस्त्यावर तसेच मोठ्या नाल्यात "पानफुल वहा आंदोलन" सुद्धा करण्यात आले होते. या सर्वांची दखल उशिराने का होईना घेतली जाऊन जवळपास ३० वर्षानंतर हा रस्ता व नाला एकदाचा बांधण्यात आला आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण सुद्धा करण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत रोहित्र तसेच विद्युत खांब अनेक महिने रस्त्याच्या मध्येच उभे होते. रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत रोहित्र तसेच विद्युत खांब जवळपास तीन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मधून काढण्यात आले आणि नाल्या लगत रोवण्यात आले मात्र रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना विद्युत रोहित्र आणि विद्युत खांबासाठी सोडलेले चर जवळपास तीन महिने उलटूनही कॉंक्रिटीकरण करून रोड लेवल करण्यात आले नाही. यामुळे येथे रात्री बेरात्री मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या सर्व बाबी पाहता बीड नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथे सोडण्यात आलेले विद्युत रोहित्र तसेच विद्युत खांबांचे चर कॉंक्रिटीकरणाने भरणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत