Breaking News

*अबब! अबब! हे महावितरणा चे लाईट बिल कि खंडणी वसुली*


*अबब! अबब! हे महावितरणा चे लाईट बिल कि खंडणी वसुली*

भरमसाठ लाईट बिले भरले तरी ऐन संनात लाईट कशी जाते कुणास टाऊक. का
तिथे असणारे सर्व इंग्रजा ची औलादी आहेत का कि यांना भारतातले सनवारे कळत नाही.
आपल्या संस्कृतीत असणारे सणवारात लाईट का घालवितात यांचे आधी उत्तरे द्यावीत महावितरनाने.

सर्व सामान्य लोकांहो झोपेचं सोंग सोडून महावितरनाची झोप उडवा
लोकांहो तुम्हलाच झोपेतून उठायचं नाही, जागे व्हायचं नाही. तर तुम्ही महावितरणाची कशी आणि कधी झोप उडवणार, आपण लोकांहो मगरीच्या जातींचे आहोत का पुढे काही घडो आपण फक्त सुस्त होऊन बसत राहायचं.
तुम्ही गप्पा ना म्हणून कोणी यावे टपली मारून जावे असा खेळ चालू आहे. भरमसाठ लाईट बिले ते देतात, आपण फक्त खूप आलं लाईट बिल म्हणून नुसते म्हणायचे आणि चुपचाप तेवढे बिल भरायचं. परत महिनाभर मगरीच्या अवस्थेत.
*चला, उठा हि अवस्था सोडून दया*
खरंतर महावितरण चे ध्येय पहा पुढील प्रमाणे.हे स्वतः महावितरणाचे ध्येय आहे असे नमूद आहे.
*महावितरण, स्वस्त दरात सर्वांना अखंडित आणि दर्जेदार वीज देण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे*.
आता मला सांगा महावितरणाचे वरील ध्येय पूर्ण करतात का कि नुसती खंडणी वसुल करतात.
एक तर इतर काही राज्यात विजदर कमी आहे.महाराष्ट्रतच का जास्तीचे याचा ही विचार केला जावा.म्हणूनच वेळीच जागे व्हायला हवे. शांत राहून फक्त जास्तीचे लाईट बिले भरायचे कि त्यावर उपाययोजना करायची हे ठरवा नाहीतर मग घरात बसून वर्षानुवर्षे खूप जास्त लाईटबील आले हे म्हणत बसा. वैचारिक लेवलाच क्रांतीचे झेंडे लावत नसतात.या सर्वांनी सहभाग नोंदवा. आपण सर्वांनी मिळून काय काय होऊ शकते याचा एक भाग होऊन प्रत्यक्षात कृती करूयात.आपल्या कडे जर काही उपाययोजना असेल तर मला कळवा आपण सर्वांचा विचार घेऊन एक संघ होऊयात.

*लेखन - रुपाली देशपांडे*
*संपर्क - 8888955539*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत