Breaking News

संध्या आकाश जाधव या गोड गायक जोडीला कलाभूषण पुरस्कार जाहीर


संध्या आकाश जाधव या गोड गायक जोडीला कलाभूषण पुरस्कार जाहीर

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या काही वर्षात गायन क्षेत्रामध्ये आपल्या गोड गायकीच्या माध्यमातून संध्या आणि आकाश हे जाधव दांपत्य अक्षरशः धुमाकूळ घालत असून त्यांच्या गायन कलेची बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नोंद घेतली जात आहे. कुठेही चांगला कौटुंबिक कार्यक्रम असला की या गोड गळ्याच्या दाम्पत्यांना गीत संगीत रसिक आपल्या कार्यक्रमाला रंगतदार बनवण्यासाठी आवर्जून बोलावतात. यामुळे या दोघांच्या गायन कलेची ख्याती जवळपास महाराष्ट्र भर पसरली असल्याने माजलगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकार संघाने या दाम्पत्याला कलाभूषण पुरस्कार जाहीर केले आहेत. यामुळे संध्या आणि आकाश या जाधव दांपत्यांवर समाजाच्या सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी यापुढेही गायन कलेला असेच समर्पित राहून बीड जिल्ह्याचे नाव फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा उंचवावे अशा सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देण्यात येत आहे.
निर्भीड पत्रकार संघ माजलगाव कडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूकनायक पुरस्कार तसेच कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, समाजकार्य, आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान अतिथी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन केला जातो. या वर्षीचा कलाभूषण पुरस्कार गायक तथा निवेदक आकाश जाधव (हे गायकीसह निवेदक म्हणून ही लक्षवेधी प्रस्तुती करीत आहेत) आणि त्यांच्या सौभाग्यवती गायिका संध्या जाधव यांना जाहीर करण्यात आला असून अतिथी मान्यवरांच्या हस्ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव येथे भव्यदिव्य कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कलाभूषण पुरस्कारासाठी गायन क्षेत्रातील या गोड जोडीची निवड निर्भीड पत्रकार संघ माजलगाव चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आडागळे यांनी केली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत