Breaking News

सरकारी अभियंता नेमके कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकून येतात? - एस.एम.युसूफ़


सरकारी अभियंता नेमके कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकून येतात? - एस.एम.युसूफ़

नाल्यांच्या भिंतीं ना तिरप्या रेषेत, ना नाल्याला चढ-उतार

बीड (एस.एम.न्युज़) - शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये रस्ते निर्माण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारे नाले व नाल्या तयार करताना ते सर्रासपणे सपाट आणि दोन्ही बाजूच्या भिंती सरळ उभ्या करण्यात येत आहे. असे नाले व नाल्यांमधून गलिच्छ पाण्याचा प्रवाह वाहून न जाता थांबून राहतो. यामुळे शहरात गलिच्छता तर वाढतेच शिवाय डासांची उत्पत्ती होऊन मोठ्या प्रमाणात डास निर्माण होतात. मात्र याकडे ना बीड नगर परिषद लक्ष देते, ना जिल्हा प्रशासन. म्हणून सरकारी अभियंता नेमके कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकून येतात? याकडे बीड नगर परिषद सह जिल्हा प्रशासनानेही लक्ष द्यावे.
बीड शहरातील नगर नाका ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या कॅनॉल रोडवर मोठ्या नाल्याचे काम प्रगतीपथावर आहे. असे मोठे नाले बनविताना त्यांना एका बाजूने चढ व दुसऱ्या बाजूने उतार राहणे अपेक्षित असते. शिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूकडील भिंती सरळ रेषेत न बांधता त्या थोड्याशा तिरप्या रेषेत बांधणे आवश्यक असते. जसे पाटबंधारे विभाग बंधारे बांधताना बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूच्या भिंती तिरप्या रेषेत बांधतात. मोठ्या नाल्यांना सुद्धा अशाच प्रकारच्या भिंती बांधणे आवश्यक असताना सरकारी काम करणारे अभियंता मात्र मोठ्या नाल्यांना ना चढ देतात ना उतार देतात. दोन्ही बाजूच्या भिंती तिरप्या रेषेत न बांधता सरळ बांधून टाकतात. अशा सदोष नाले बांधणीमुळे नाल्यात पाणी वाहते न राहता तुंबून राहते. यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन डासांचा सुळसुळाट होतो, गलिच्छ पाणी तुंबून राहिल्याने दुर्गंधी सुटते. पर्यायाने लोकांना त्याचा खूप त्रास होतो. या बाबीकडे बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाचेही साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. बीड शहरात अशा प्रकारे सदोष बांधकाम सरकारी अभियंत्यांकडून सर्रासपणे करण्यात येत असल्याने सरकारी अभियंता नेमके कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकून येतात? याकडे बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाने ही लक्ष द्यावे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत