Breaking News

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतली बातमीची दखल तुकडेबंदीची महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतली बातमीची दखल

तुकडेबंदीची महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

बीड (एस.एम.न्युज़) - तुकडे बंदी सुधारणा कायदा दोन्ही सदनात मंजूर होऊन ही बीड जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. यामुळे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी *'तुकडे बंदी सुधारणा कायदा दोन्ही सदनात मंजूर होऊनही गोरगरिबांच्या स्वप्नातील घरांचा मार्ग मोकळा होईना, उच्च प्रशासनिक अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज'* या शीर्षकाने प्रसिद्धी माध्यमात बातमी दिली होती. या बातमीची दखल घेऊन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तुकडेबंदीची महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. यामुळे आता तुकडेबंदीच्या कार्याला प्रशासनिक स्तरावर वेग येणार असून एक महिन्यानंतर सार्वजनिक स्तरावर याचे कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त करून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी एक महिन्यानंतर याचा फेर आढावा घेऊन तुकडेबंदीचे कामकाज जनतेला त्रास न होता सुरळीतपणे सुरू होईल याकडे सुद्धा लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे.
















==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत