Breaking News

*माणुसकी अजून जिवंत आहे; इंसानियत अभी ज़िंदा है*


 *माणुसकी अजून जिवंत आहे; इंसानियत अभी ज़िंदा है*

*लोकसहभागातून मिळणाऱ्या आर्थिक काठीचा सायमाला आधार*

*पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये टाकतेय एक-एक पाऊल*

*दानशूरांकडून आतापर्यंत १ लाख ३५ हजांची मदत*

पाटोदा (एस.एम.न्युज़) - उपचाराअभावी अंपगत्व आलेल्या सायमा बेग हिच्यावर पुणे येथील संचेती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असुन तिच्या प्रकृतीमध्ये चांगलाच सुधार होत आहे.
सायमाचे वडील हे शेतात सालगडी असुन त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने योग्य उपचार करू न शकल्याने सायमाला अंपगत्व आले होते. ही गंभीर बाब लक्षात येताच सय्यद शफाउद्दीन तसेच पत्रकार हमीदखान पठाण, जावेद शेख यांनी उपचारासाठी लोकसहभागाचे आवाहन केले असता आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असुन बीड जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या दानशूरांनी सायमावर उपचार करण्यासाठी आतापर्यंत १ लाख ३५ हजारांची मदत केली असून अजुनही मदतीचा ओघ सुरू आहे.
सायमा ही ९ वर्षांपासून अंथरुणातच असल्याने शरीरावर याचे दुष्परिणाम झाल्याने काही भागावर जखमा झाल्या आहेत. यामुळे तिच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराला बांधा येत असून सध्या त्या जखमावर उपचार करण्यात येत आहे. जखमा लवकर बऱ्या झाल्या नाही तर तेथेही सर्जरी करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एकुणच लोकसहभागातून सायमावर उपचार होत असून समाजातील दानशूर आर्थिक मदत देत असल्याने लोकसहभागाच्या काठीचा आधार घेत सायमा एक-एक पाऊल पुढे टाकत आहे.

*कुटुंबाला धीर देत उपचाराचा आढावा घेतला*
घटनेची गंभीरता पाहुन माजी बीड जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सय्यद शफाउद्दीन, पत्रकार जावेद शेख यांच्यासह सायमा बेग हिच्या सोबतच तिच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत असा धीर देत  संचेती हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर पराग संचेती यांच्याशी संवाद साधत उपचाराचा आढावा घेतला.

*उपचाराअभावी अपंगत्व येणं ही दुर्दैवी बाब - सय्यद अब्दुल्ला*
उपचाराअभावी अंपगत्व येणं ही दुर्दैवी बाब असुन बेग कुटुंबाने  घटनेची वाच्यता लवकर जाहीर केली असती तर सायमाला ९ वर्षे अंथरुणावर पडून हाल अपेष्टा सोसत संघर्ष करावा लागला नसता. तरी जी मदत बेग कुटुंबाला लागेल ती करणार असे यावेळी सय्यद अब्दुल्ला यांनी म्हटले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत