Breaking News

ज्येष्ठ पत्रकार मुहम्मद मुस्लीम कबीर यांना इब्राहिमसाब सरगुरू जीवन गौरव पुरस्कार जाहीर


ज्येष्ठ पत्रकार मुहम्मद मुस्लीम कबीर  यांना इब्राहिमसाब सरगुरू जीवन गौरव पुरस्कार जाहीर

औसा (एस.एम.न्युज़) - औसा शहरातील अरबी भाषेचे अभ्यासक, मौलवी व विचारवंत दिवंगत इब्राहिम साब जुल्फेकार अली सरगुरु यांच्या स्मरणार्थ व मेहताबसाब अजमोदिन पटवारी एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत मौलवी हबीबोद्दीन पटेल, सेवानिवृत्त शिक्षक दिवंगत मौलवी शेख करीमसाब आणि गेल्या वर्षी सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे अलहाज हिमायत पटेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार, उर्दू, मराठी आणि हिंदी पत्रकारितेत अग्रेसर, ज्येष्ठ पत्रकार मुहम्मद मुस्लीम कबीर  यांना दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी हाश्मी फंक्शन हॉल औसा येथे ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन  समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती मेहताबसाब अजमोदिन पटवारी एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटीचे सचिव ॲड. इक्बाल शेख यांनी दिली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत