Breaking News

अमिताभ बच्चन यांचं चिंताजनक ट्वीट 'जाण्याची वेळ झाली आहे'; चाहते काळजीत


 अमिताभ बच्चन यांचं चिंताजनक ट्वीट

'जाण्याची वेळ झाली आहे'; चाहते काळजीत

मुंबई (एस.एम.न्युज़) - बॉलीवूडचे शहेनशहा, मेगास्टार, बिग बिग अशा विविध बिरूदावल्यांनी नावाजलेले हिंदी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटर वरून 'जाण्याची वेळ झाली आहे' असे ट्विट केल्याने चाहत्यांमध्ये चिंता वाढली असून कोट्यावधी चाहते चिंतेत पडले आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन सतत त्यांच्या कामामध्ये खूप व्यग्र असतात. तरीही वेळात वेळ काढून ते दररोज त्यांच्या ब्लॉग आणि ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त करतात, विचार शेअर करतात. नुकतेच त्यांनी असं काही ट्विट केलं ज्यामुळे चाहते घाबरले आणि नेमकं काय झालं ते विचारू लागले आहेत. ८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३४ वाजता ट्विट केलं की, 'जाण्याची वेळ झाली आहे.' अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये हे स्पष्ट केलं नाही की, त्यांनी जाण्याबद्दल कोणत्या संदर्भात लिहिलं आहे किंवा ते कशाबद्दल बोलत आहेत. या ट्विटनंतर चाहत्यांची चिंता वाढली असून नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत