Breaking News

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अन्न त्याग आमरण उपोषण - कॉ. सखाराम पोहिकर


ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न त्याग आमरण उपोषण - कॉ. सखाराम पोहिकर 

गेवराई (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन मान्य प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने येत्या दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजेपासून गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक पातळीवर काही शासनमान्य मागण्या प्रलंबित असून शासनमान्य बऱ्याच मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावणीस्तव प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे वारंवार ही बाब निदर्शनास आणून आणि वारंवार पाठ पुरवठा करून सुद्धा त्यास प्रतिसाद मिळत नाही. यासंदर्भात शासनाचे जबाबदार संबंधीत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी समन्वयासाठी बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बैठकच घेण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. म्हणून ना इलाजाने अन्न त्याग आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अन्नत्याग आमरण उपोषणामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन त्वरित देण्यात यावे. राहणीमान भत्त्यासहित मासिक वेतन द्यावे. आत्तापर्यंतचा थकीत राहणीमान भत्ता त्वरित अदा करावा. भविष्य निर्वाह निधीची वेतनातून कपात केलेली ०८.३३% रक्कम अधिक शासन हिस्सा ०८.३३% रकमेच्या हिशोबाचा तपशील द्यावा. पावत्या द्याव्या. पासबुकच्या नोंदी अध्यायात करावे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्यावे. आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन द्यावे. सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सूडबुद्धीने वागणूक देऊ नये. याविषयी यापूर्वी सुद्धा वेळोवेळी धरणे, आंदोलने व संघटनेद्वारे वेळोवेळी पत्र व्यवहार करण्यात आला आहे पण याची दखल अजूनही घेतली नसल्याने दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न त्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुकाध्यक्ष कॉ. सखाराम पोहिकर, तालुका सचिव सय्यद जावेद, सातिराम बाबासाहेब गव्हाणे, पठाण अकबर सत्तार, अनंत अरुण लगड, रावसाहेब गोपीनाथ राठोड, सुदाम लिंबराज मासाळ, शेख यासीन आदींनी दिली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत