तुकडेबंदी सुधारणा कायदा दोन्ही सदनात मंजूर होऊनही गोरगरीबांच्या स्वप्नातील घरांचा मार्ग मोकळा होईना! उच्च पदस्थ प्रशासनिक अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज - एस.एम.युसूफ़
तुकडेबंदी सुधारणा कायदा दोन्ही सदनात मंजूर होऊनही गोरगरीबांच्या स्वप्नातील घरांचा मार्ग मोकळा होईना!
उच्च पदस्थ प्रशासनिक अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - तुकडेबंदी सुधारणा कायदा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सदनात मंजूर होऊनही त्यावर अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याने गोरगरीबांच्या स्वप्नातील घरांचा मार्ग काही मोकळा होईना. तरी याकडे उच्च पदस्थ प्रशासनिक अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्याच्या विधान परिषद तसेच विधान सभा अशा दोन्ही सदनात तुकडेबंदी सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता १,२,३ गुंठ्यांची खरेदीखत प्रक्रिया सुरु व्हायला हवी होती परंतु ती अद्याप पर्यंत सुरूच झाली नाही. तुकडेबंदी अंमलबजावणीसाठी कायद्यात सुधारणा करून १, २, ३ गुंठे जागेच्या खरेदी विक्रीसाठी कायदेशीर मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेऊनही अद्याप पर्यंत त्याच्यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे नुकत्याच नागपूर येथे घेण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनात या विधेयकाला सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अध्यादेश जारी करण्यात आला होता. यामुळे लहान भूखंड खरेदीचा मार्ग मोकळा झाला असूनही १,२,३ गुंठ्यांवर आधारित व्यवहार अजूनही प्रशासन दरबारी सुरूच करण्यात न आल्याने सर्वसामान्य गोरगरीब स्वतःच्या घरासाठी जमीन घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अजूनही पूर्णत्वास जात नसल्याचे बीड जिल्ह्यात दिसून येत आहे. तरी याकडे उच्च पदस्थ प्रशासनिक अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा