जामिया इस्लामीया बहरूल उलुम मदरसात अध्यात्मिक शिक्षणासह आधुनिक शिक्षण
*१२० विद्यार्थी अरबी, उर्दूसह घेताहेत मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोलचे शिक्षण*
पाटोदा (एस.एम.न्युज़) - अध्यात्मिक शिक्षण हे संस्कार घडविण्यासाठी महत्वपूर्ण मानले तरी जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक शिक्षण महत्वाचे असल्याने अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात वावरताना सर्व समावेशक व्हावे या उद्देशाने पाटोदा शहरातील जामिया इस्लामीया बहरूल उलुममध्ये अरबी, उर्दूसह इंग्रजी, मराठी, गणित, इतिहास, भूगोल आदी विषयांचे शिक्षण दिले जात आहे. या मदरसात दिनांक ५ फेब्रुवारी बुधवार रोजी द्वितीय सत्राची परिक्षा घेण्यात आली. यात एकुण १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये गटानुसार विद्यार्थ्यी शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षाला सामोरे जात आहे. या विद्यार्थ्यांच्या अक्षरावरून ते फक्त अध्यात्मिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत असे वाटत नाही. सलिम तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सचिन गायकवाड तसेच अमजद पठाण हे सर्व मिळून चांगले विद्यार्थ्यी घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे दिसून आले. अध्यात्मिक शिक्षण बरोबरच आधुनिक शिक्षण देणारे मदरसा जामिया इस्लामिया बहरूल उलुम चे मुफ्ती जफ़र, मौलाना अब्दुल मौइज, मौलाना मज़हर, मौलाना अरबाज़,मौलाना ज़हूर, अमजद, सचीन, अमजद पठान, अय्युब मोमीन या सर्व शिक्षकांचे प्रयत्न व शिक्षण देण्याची पद्धत कौतुकास पात्र असल्याचे दिसून येत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा