श्री.सोमेश्वर संस्थान महाशिवरात्र महोत्सव!
ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील बार्शी रोड स्थित सोमेश्वर महादेव मंदिर येथे श्री सोमेश्वर विश्वस्त संस्थान मार्फत महाशिवरात्र महोत्सव प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे गुरुवार दि.२० फेब्रुवारी पासून ह.भ.प. गुरूवर्य महंत महादेव महाराज चाकरवाडीकर आणि सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महाशिवरात्री महोत्सव सोहळ्याची सांगता आज दि.२७ गुरुवार रोजी ह.भ.प. माधव महाराज डाके काठेवाडीकर यांच्या शुभहस्ते कलश स्थापना आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर महाराज यांच्या सुश्राव्य अमृततुल्य दहिहंडीच्या कार्यक्रमाने काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर ह.भ.प. भाऊसाहेब बाळकृष्ण जोशी राजपिंपरीकर गेवराई, ह.भ.प. दीपक महाराज मेटे केज, ह.भ.प. विक्रम महाराज काळे आळंदीकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज इंगळे निंघुरकर, महंत स्वामी योगीराज महाराज श्रीक्षेत्र रामगड, ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी विठ्ठल मंदिर बीड, निशुल्क कीर्तनकार ह.भ.प. रंधवे बापू महाराज (महाराष्ट्र राज्य पुरस्कार सन्मानित गिनीज बुकात नोंद) पाटोदा. यांच्या किर्तनाने समाज प्रबोधन करत सेवा संपन्न झाली. पंचक्रोशीतील विविध गावांतील मृदुंगाचार्य, वारकरी, भजनी मंडळ यांच्याद्वारे हरिजागर आणि प्रवचने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सोमेश्वर महादेव मंदिर संस्थान महाशिवरात्र उत्सव कमिटी बीड, विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. किर्तनानंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
*उपस्थितांचे संस्थानच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन*
सोमेश्वर महादेव मंदिर संस्थान महाशिवरात्र महोत्सव सांगता सोहळ्यात यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे, ह.भ.प. अरुण नाना डाके, अलकाताई डावकर, बाबुरावजी परळकर, पांडुरंग जानोळे, श्रीमती राजर्षी प्रदीप बाब्रस, गोरख शिराळे, ॲड. गोविंद शिराळे, सदाशिव शेजाळ, बाबासाहेब शिंदे, प्रधान पवार, श्रीहरी वाघमारे, दोडके सर, हरिदास जोगदंड, महादेव आंधळकर, बाळू गलधर, श्रीराम मुळे, बंडू कदम, आत्माराम शिराळे, वसंत कदम, विनोद अनिल परांडकर, अनिल धांडे, दीपक कदम, नागोराव काकडे, बप्पासाहेब घुगे, गोरख भाऊ गायकवाड यांनी संस्थानच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले.
संस्थानच्या वतीने नवनाथ अण्णा शिराळे यांनी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली मांजरेकर यांचा व नवनाथ अण्णा शिराळे यांचा दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांनी सर्व महाराज, भाविकभक्तगण, वारकरी, टाळकरी, सेवक सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत संस्थानच्या विकासासाठी भरीव योगदान आणण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे म्हटले.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा