रमज़ान निमित्ताने काढण्यात येणाऱ्या पत्रकांचा परिणाम होतो विपरित
बीड (एस.एम.न्युज़) - इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना रमजान संभवतः येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे. या निमित्ताने अनेकजण प्रसिद्धी माध्यमातुन पत्रके काढत आहेत. दरवर्षी अशी पत्रके काढण्यात येतात. मात्र या पत्रकांचा परिणाम नेमका विपरित होतो. यामुळे याचा त्रास फक्त मुस्लिमांनाच नाही तर समाजातील सर्वच धर्मीयांना होतो. यामुळे पत्रकांऐवजी सेवा सुरळीत करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.
नेत्यांसह कार्यकर्त्यांकडूनही मोठ्या संख्येने पत्रके काढण्याचा महिना म्हणजे रमज़ान. इस्लाम धर्मात रमज़ान हा महिना अत्यंत पवित्र तसेच परोपकारी कार्य करण्यास मोठे वाव असलेला महिना आहे. हा महिना सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर अनेकजण रमज़ान महिन्यात नळांना एवढ्या दिवसात पाणी सोडा, विद्युत पुरवठा खंडित करू नका, नाल्यांची स्वच्छता करा, कचरा वेळेवर उचला, रस्त्यांवर झाडू मारा, शहराला गलिच्छतेपासून मुक्त करा, रस्त्यांचे खड्डे बुजवा असे एक ना अनेक प्रश्न व समस्यांचा उहापोह पत्रकातून करतात. यातील काही प्रश्न हे नगर परिषदेच्या तर काही महावितरण कंपनीशी निगडित असतात. रमजान निमित्ताने करण्यात येणारी पत्रकबाजी सुरू झाली की मग अनियमित पाणीपुरवठा सुरू होतो. वारंवार वीज खंडित होते. तीही खास करून पहाटे सहरीच्या वेळी आणि संध्याकाळी रोजा सोडण्याच्या वेळी. नाल्यांची स्वच्छता वेळीच करण्यात येत नाही. कचरा वेळेवर उचलला जात नाही. रस्त्यांवर झाडू मारले जात नाही. रस्त्यांचे खड्डे बुजविणे तर दुर त्यांकडे पाहिले सुद्धा जात नाही. पर्यायाने शहरातली गलिच्छता वाढत जाते. हा क्रम गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवयास मिळत आहे. म्हणून रमज़ान निमित्ताने काढण्यात येणाऱ्या अशा पत्रकांमुळे फक्त इस्लाम धर्मीय मुसलमानच नाही तर इतर धर्मीयांना सुद्धा बीड नगर परिषद तसेच महावितरण कंपनीकडून मिळणाऱ्या सेवांमध्ये गडबड होते. याचा त्रास फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्मीयांना सुद्धा होतो. यामुळे अशी पत्रके काढण्याऐवजी जिथे कुठे ज्या काही समस्या असतील त्या पुढे येऊन संबंधित विभागाकडून सुरळीत करून घेण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.
================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा