बीड पंचायत समितीचे अधिकारी झोपेत; जाहिरातकर्ते मजेत!
बीड नगर परिषदेच्या मोहिमेस गालबोट; दंडात्मक कारवाया करण्याची गरज
बीड (एस.एम.न्युज़) - बीड नगर परिषदेने एकीकडे शहरातील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण तसेच डिजिटल बॅनर काढण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून शहरात राबवली असताना या मोहिमेस बीड पंचायत समितीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे गालबोट लागत आहे. बीड पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूने खाजगी जाहिरातकर्त्यांचे दोन भले मोठे डिजिटल बॅनर लावलेले दिसत आहे. यामुळे बीड पंचायत समितीचे अधिकारी झोपेत तर जाहिरातकर्ते मजेत असे म्हणण्याची वेळ आली आहे. याकडे बीड नगर परिषदेने लक्ष देऊन दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
बीड शहरात ज्याच्या मनात येईल तो उठतो आणि कुठेही डिजिटल बॅनर लावत सुटतो. अशाप्रकारे लावण्यात येणाऱ्या डिजिटल बॅनर च्या गुत्तेदारांकडून किंवा जाहिरातकर्त्यांकडून शासनाला किंवा बीड नगर परिषदेला महसूल रूपात एक छदामही मिळत नाही. परंतु शहराचे विद्रूपीकरण मात्र होते. गेल्या काही वर्षात फक्त बीड शहरच नाही तर सगळीकडेच अत्यंत खालच्या पातळीचे तसेच गलिच्छ राजकारण होत असल्याने अशा प्रकारे डिजिटल बॅनरचा सुळसुळाट करणाऱ्यांवर कोणाचा वचकच राहिला नाही. परंतु कसे कोणास ठाऊक गेल्या काही दिवसांपासून बीड नगर परिषद अचानकच कर्तव्यदक्ष झाल्याने शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमणे तसेच डिजिटल बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बीड पंचायत समितीचे कार्यालय हे शहराच्या बीड-अहेमदनगर या राज्य मार्गावर नगर नाका परिसरात आहे. गेल्या वर्षीच या पंचायत समितीची नवी प्रशस्त इमारत तयार करण्यात आली आणि जुन्या इमारती मधून या नवीन इमारतीत पंचायत समिती स्थलांतरित करण्यात आली आहे. याच इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूने खाजगी जाहिरातकर्त्यांचे दोन मोठे डिजिटल बॅनर लावण्यात आलेले आहे. या कार्यालयात असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवसातून अनेकदा ये-जा करताना हे बॅनर दिसत नाही का? की ते झोपेत आहेत? असे प्रश्न पडत आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे अशाप्रकारे खाजगी जाहिरातकर्ते मात्र मजेत असून मनाला येईल तिथे विनामूल्य बॅनर लावायला मिळत असल्याने त्यांच्याकडून शहराचे विद्रूपीकरण होत आहे. परंतु सरकारी अधिकारी आणि कर्मचारी मात्र डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखे कार्यालयात ये-जा करत असल्याचे प्रतीत होत आहे. बीड नगर परिषदेने असे अनधिकृत व विनामूल्य जाहिरातींच्या फलकांनी विद्रूपीकरण करणाऱ्यांचे बॅनर जप्त करून जाहिरातकर्त्यांसह बॅनर लावणाऱ्यांवर जबर दंडात्मक कारवाया करणे गरजेचे आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा