सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार वीज बिल भरणा केंद्र
अखंडित वीजपुरवठ्यासाठी वीजग्राहकांनी वीज बील भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - सुट्टीच्या दिवशीही वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून वीजग्राहकांनी वीजबीले वेळेवर भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
मार्च अखेर वीजबील वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या हेतूने महावितरणच्या वतीने वीज देयक वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले असून शनिवार व रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या काळातही वसुली पथके वसुलीसाठी कार्यरत राहणार आहेत. सुट्ट्यांच्या काळात वीज ग्राहकांना विजेचे बिल भरता यावे याकरिता महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महावितरणचे मोबाईल ॲप, मोबाईल वॉलेट तसेच ऑनलाईन असणाऱ्या विविध पर्यायांचा वापर करत वीज ग्राहकांनी आपल्या थकीत व चालू वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे तसेच उन्हाळ्याच्या काळात वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी त्वरीत वीजबील भरावे असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा