Breaking News

जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडीत झालेल्या २ हजार ३७७ ग्राहकांना महावितरणचे अभय

६ कोटी ४० लाखांची मिळाली सुट, वीजपुरवठाही झाला पुनरुज्जीवीत; ३१ मार्च पर्यंतच घेता येणार लाभ!

बीड (एस.एम.न्युज़) - वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेचा लाभ घेत काल पर्यंत बीड मंडळातील २ हजार ३७७ वीजग्राहकांनी लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे ३१ मार्च अखेर पर्यंत देण्यात आलेल्या वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. सदर योजनेस ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, गेवराई, पाटोदा व शिरूर कासार या उपविभागांचा समावेश असलेल्या बीड विभागातील १६९२ वीजग्राहकांनी २ कोटी २८ लाख रूपयांचा भरणा करत १ कोटी ७४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर अंबाजोगाई, धारूर, केज, माजलगाव,परळी व तेलगाव उपविभागाचा समावेश असलेल्या अंबाजोगाई विभागातील ६८५ वीजग्राहकांनी ६ कोटी २४ लाख रूपयांचा भरणा करत ४ कोटी ६६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. या सर्व वीजग्राहकांचा खंडीत झालेला वीजपुरवठा पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना १० टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना ०५ टक्के सवलत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत