Breaking News

राशन दुकानांवर गहू ऐवजी ज्वारी; शासनाचा हा निर्णय रोजेदारांवर पडणार भारी!


सणासुदीच्या काळात जनतेला सोसावी लागेल अतिरिक्त आर्थिक झळ - एस.एम.युसूफ़

बीड (एस.एम.न्युज़) - शासनाकडून या महिन्यापासून राशन दुकानांवर गहू ऐवजी ज्वारी पाठविण्यात येत असल्याने शासनाचा हा निर्णय रोजेदारांवर भारी पडणार असून शासनाला जर राशन कार्ड धारकांना ज्वारी द्यायचीच असेल तर ती गव्हा ऐवजी नको तांदळा ऐवजी देण्याची मागणी होण्याची शक्यता दिसून येत आहे. राशन दुकानावरून गहू बंद केल्यास सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात अतिरिक्त आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
शासनाने राशन दुकानांवरून राशन कार्ड धारकांना आता गव्हा ऐवजी ज्वारी देण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील राशन दुकानांवर गहू न येता त्या ऐवजी ज्वारी आली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब राशन कार्ड धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे. त्यातच इस्लाम धर्माचा रमजान महिना पुढील मार्च महिन्याच्या दोन तारखेपासून सुरू होणार आहे. रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील महिला, पुरुष, तरुण-तरुणी, आबालवृद्ध सर्वच जण रमजानचे रोजे धरतात. रमजान महिन्यात रोजा असताना मुस्लिम समाज शक्यतो पहाटे सहरीसाठी तसेच दिवस मावळताना रोजा सोडल्यानंतर जेवणासाठी गव्हाच्या पोळ्यांचाच जास्त उपयोग करतो. मुस्लिम समाजातील रोज़ेदार रमजानच्या महिन्यात ज्वारीची भाकर बनवीत नाही आणि खातही नाही. नेमके याच काळात शासनाकडून राशन दुकानांवर गव्हा ऐवजी ज्वारी पाठविण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याशिवाय येत्या एप्रिल महिन्यात भारतरत्न संविधान रचयिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा येत आहे. यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने असलेल्या दलित-मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेता शासनाने गहू बंद करून ज्वारी देऊ नये तसेच शासनाकडे जर ज्वारी मोठ्या प्रमाणात शिल्लक असेलच तर शासनाने ती गव्हा ऐवजी न देता तांदळा ऐवजी दिली तर एक वेळ ठीक आहे परंतु असे न करता गव्हा ऐवजी ज्वारी पाठविण्यात येऊ नये. अशी मागणी होण्याची शक्यता आहे. शासनाने याकडे जातीने लक्ष देऊन ऐन रमजान महिन्याच्या तोंडावर तसेच आगामी आंबेडकर जयंतीकडे लक्ष देऊन अन्नधान्याचा पुरवठा करावा नसता जनतेतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण राशन दुकानावरून गहू बंद केल्यास ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गव्हाचे दर वाढतील. ज्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अतिरिक्त आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत