Breaking News

ॲड. असीमा पटेल यांच्या युक्तिवादाने विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीस जामीन मंजूर


ॲड. असीमा पटेल यांच्या युक्तिवादाने विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीस जामीन मंजूर

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील हिवरापहाडी येथील एका कुटुंबाने गावातील एक व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. पीडित मुलीच्या परिवारांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांची १२ वर्षीय मुलगी हिने गावातील बंडू दत्ता वाघमारे याच्यावर आरोप केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पीडित मुलगी ही आपल्या घराजवळ सायकल खेळत असताना, बंडू वाघमारे याने तिला अचानक रोखून तिचा हात पकडला आणि 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत चल, असे म्हणत तिच्यावर वाईट हेतूने हल्ला केला. मुलीनने घरात आल्यानंतर हे सर्व सांगितले, ज्यावर तातडीने तिच्या कुटुंबाने वाघमारे याला शोधले, परंतु तो घरावर नव्हता. पीडित मुलीच्या परिवाराने यापूर्वीही बंडू वाघमारे याला समजावले होते, कारण तो त्यांच्या घराच्या आसपास मुलींवर नजर ठेवूनच असे. तरीही, वाघमारे याचे वर्तन काही बदलले नाही. या घटनेनंतर, पीडितेच्या कुटुंबाने तक्रार दिली असून वाघमारे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सदरील फिर्यादीनंतर आरोपी बंडू वाघमारे यांची बाजू ॲड. असीमा पटेल यांनी बीड जिल्हा न्यायालयात जामिनासाठी मांडली. ॲड. असीमा पटेल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमुर्ती एस.आर.पाटील न्यायालयाने आरोपीला जामीन दिला आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत