Breaking News

मौलाना आझाद युवा मंचचे मराठवाडा अध्यक्षपद अरफात खान यांना द्या - सय्यद सलमान


बीड (एस.एम.न्युज़) - मौलाना आझाद युवा मंच चे बीड जिल्हाध्यक्ष अरफात खान यांना मराठवाडा अध्यक्ष पद द्यावे अशी मागणी मंचाचे बीड शहराध्यक्ष सय्यद सलमान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

         याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, अरफात खान यांना मौलाना आझाद युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख खलील अहेमद यांनी बीड जिल्हाध्यक्ष पद दिल्यापासून अरफात खान यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याच्या धडाक्याने मंचाला एका विशिष्ट उंचीवर नेले आहे. दिवसेंदिवस मंचाचे संघटन मजबूत करत आहेत. जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी आतापर्यंत अनेक तरुणांना विविध पदे देऊन संघटनेचा आवाका वाढविला आहे. नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मिळून शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मंचासोबत जोडले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मौलाना आझाद युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख खलील अहेमद यांनी मंचाचे रिक्त असलेले मराठवाडा अध्यक्षपद अरफात खान यांना द्यावे. कारण जिल्हा पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना ते मंचासाठी करत असलेले उल्लेखनीय कार्य पाहता त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून मराठवाडा विभागाचे अध्यक्षपद देऊन त्यांना मराठवाडा विभागीय पातळीवर काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ते संपूर्ण मराठवाडा भर मंचाचे संघटन दिवसेंदिवस वाढवून चांगले मजबूत करतील आणि मंचाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील असेही मंचाचे शहराध्यक्ष सय्यद सलमान यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत