बेडर नेता शफिक भाऊ संभल घटनेच्या विरोधात पुढे आले जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
बीड (एस.एम.न्युज़) - काही दिवसांपूर्वी देशातील उत्तर प्रदेश राज्यात संभल येथील जामा मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात अनेक मुस्लिम तरुणांचे जीव गेले. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी आपल्या शिष्टमंडळासह दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संभल (युपी) येथील 500 वर्षे जुनी जामा मस्जिद मध्ये करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये अनेक मुस्लिम समाजाच्या निष्पाप युवकांचे बळी गेले (शहीद) झाले. या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, मराठवाडाध्यक्ष फेरोज लाला यांच्या आदेशावरून आज बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती व देशाचे गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुकाध्यक्ष शेख एजाज़ उर्फ़ खन्ना भैय्या, युवक जिल्हाध्यक्ष शेख मतीन, नगरसेवक मोमीन अजहर, ज्येष्ठ नेते अब्दुस्सलाम सेठ, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर, जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली, बांधकाम अध्यक्ष सय्यद बासेद, शेख अन्वर, फिरोज मनियार, शेख अलिम, शेख रोहिब आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
*शेख शफिक भाऊंनी केलेल्या मागण्या*
1) शहीद झालेल्या युवकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात यावे.
2) जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपये ची मदत देण्यात यावी.
3) दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना फास्टट्रॅक कोर्ट मार्फत लवकरात लवकर कडक शिक्षा देण्यात यावी.
4) लोकसभेमध्ये मुस्लिम संरक्षण कायदा बील आणून ते त्वरीत पारित करण्यात यावे.
5) अजमेर दर्गा (खाजा गरीब नवाज) व सलिम चिश्ती दर्गाहची बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आलेली चौकशी तात्काळ बंद करण्यात यावी.
6) जर या मागण्या मान्य न करण्यात न आल्या तर एआयएमआयएम पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा ही देशाचे राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा