वाहतूक पोलीस - रूपाली देशपांडे
जिथे असायला पाहिजे तिथे नसतात आणि नको तिथे बसतात ते म्हणजेच वाहतूक पोलीस. आपल्या बीड शहरात तर यांना तुम्ही काम करण्यापेक्षा रस्त्याच्या कोपऱ्यात जास्त पाहत असताल. रस्त्याच्या मध्यभागी थांबून ते वाहतूक सुरळीत कधीच करणार नाहीत. पण रस्त्याच्या बाजूला दूर कोपऱ्यात कुठेतरी उभे राहून आपली ड्युटी मात्र इमानदारीने करताना दिसतात. तोच तर त्यांचा धर्म आणि कर्म आहे. माफ करा पण हे बोलणे जास्तीचे होईल. पण काही चूक नाही. कधी कधी सलग म्हणजे सात्यताने ड्युटी करायची आणि कधी कधी १५ दिवस हि फिरकायचे नाही. अशामुळे दरवर्षी भर चौकात अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. हे लोक काही रस्त्यावर हायवे वर नव्हते. रोज वापरात येणारा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या चौकातील रस्त्यावर होते. यातील काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले. मला सांगा. रस्त्याच्या कडेला उभा राहून पावती फाडायचे एकाचेच काम ना? मग चौकातली ट्राफिक जाम झाली आणि सगळे एकाच ठिकाणी मग थोडी गर्दीत बाचाबाची झाली तर मग हे महाशय इकडे येऊन थोडं सरकासरकी करणार. बरं हे सणासुदीला येतात. कारण बरोबर आहे, गर्दी होते. रस्त्यात मग सुरळीत वाहने पाहणे हे याचं कर्तव्य आहे. पण बाकीच्या दिवसात दररोजच्या दिवसात ट्रॅफिक जाम होत नाही. हे या लोकांना कोणी सांगितले. विशेष म्हणजे अगदी शुल्लक कारण असले तरी हे पकडतातच. बरं अजून एक त्यांनी पकडेल्या माणसांपैकी कोणाच्या दादा, मामा, भैय्या अश्या लोकांचा फोन आला कि ते दंड न आकारता लगेच सोडून देतात. अरे मग तुम्ही पकडताच कशाला? त्याने काहीतरी चूक केली असेल म्हणूनच ना! मात्र पकडलेल्यासाठी फोन आला की, लगेच सोडून देतात, असे रे कसे बाबांनो? कधी तरी बाबा चांगली ड्युटी करा.
तुमचा विभाग कश्या साठी आहे? समाज उपयोगासाठीच ना! मात्र तुमच्या अशा तिरकस वागण्याने इथे समाजाला काय उपयोग होतो? उलट आम्हालाच पावती फाडायला लागते. विशेष म्हणेज हेच पोलीस लोक शहराच्या काही अंतरावर हि उभे असतात. तिथे तर नेमकी कशाची पावती फाडतात तेच कळत नाही. तुम्ही शहराबाहेर गेलात की, थांबव गाडी घे बाजूला असेच सुरु असते.
तुमची नियुक्ती समाजोपयोगासाठी केलेली असते. पण तुमच्याकडून नेमके या उलट सुरू असते.
*बीड शहरातीलच आपला मेन चौक बघा -*
अण्णाभाऊ साठे चौकात वाहनांच्या सुविधेसाठी काय करत असताल तर मागच्या काही वर्षात मेलेल्यांची संख्या किती, अपंगत्व आलेले किती असेल? दर रविवारी माळीवेस ते पुलापर्यंत सगळी ट्रॅफिक जाम होते. मग एखादा बिचारा ट्रॅफिक मधलाच कोणीतरी येऊन वाहतूक सुरळीत करतो. भाजी मंडईत रोज किमान एक तरी पोलीस कॉन्स्टेबल तैनात पाहिजे कारण सकाळी सर्वांनाच घाई असते. सर्वात मुख्य म्हणजे सणत्यौहारात किंवा रविवारी तुम्ही लोक सुभाष रोड ला गाडी व्यवस्थित नाही लावली तर उचलून घेता. आहो, पण सुभाष रोड साठी एखादी जागा तर आम्हाला द्या म्हणजे आम्ही गाडी नीट व्यवस्थित पार्क करू. तुम्ही येता अन् गाडी उचलता पण त्या आधी पार्किंग साठी जागा तर द्या.
माझा लिहिण्यामागचा उद्देश हाच कि वाहनांबाबत कसलीही दिरंगाई नको. तुम्ही समाजातला खूप मोठा घटक आहात. तुमचा धाक आम्हाला वाटलाच पाहिजे. जेणेकरून आम्ही सुद्धा वाहन चालवण्याबाबत दक्ष राहू.
तुमची जागा आम्हाला कोपऱ्यात नको, तुम्ही वाहनाला दिशा दाखवण्याचे काम करताना पाहायचे आहे. कृपया करून प्रत्येक महत्वाच्या चौकात असाल तर बिचारे जीव वाचतील.
*लेखन - रुपाली देशपांडे*
बीड. संपर्क - ८८८८९५५५३९
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा