Breaking News

*मोफत किंवा अल्प दराची अपेक्षा करू नका; जगणे अवघड होईल!*

                        "नम्र निवेदन"

मित्रांनो आणि माझ्या शुभचिंतकांनो, काहीजण माझ्याकडून लिखाण काम करून घेण्यासाठी मोफत किंवा अल्पदराची अपेक्षा करतात आणि तसे बोलतात सुद्धा. अशांना सांगू इच्छितो की, बाबांनो मी माझ्या नावे समाजासाठी जे लिखाण करतो ती माझ्याकडून समाजसेवा असते परंतु इतरांसाठी जे त्यांच्यासाठी वैयक्तिक लिखाण करून देतो तोच माझा व्यवसाय आहे. त्याला समाजसेवेच्या दृष्टिकोनातून कृपया पाहू नका. 

मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी पैसा लागतोय, घर प्रपंच चालविण्यासाठी पैसा लागतोय, दिवसातून तीन वेळेस मेडिसिन खाण्यासाठी पैसा लागतोय, शिवाय लाईट बिल आहेच. महागाई चिक्कार वाढली आहे. त्यामुळे जीवन जगताना नाकी नऊ येत आहे. 

हे सर्व करण्यासाठी सगळं काही आलबेल असल्याचं आव किंवा माझ्याकडे मुळातच नसलेल्या पैशाचं सोंग मला तरी करता येत नाही. मी लपुटांसारखा लपुटपणा करू शकत नाही, निलाजऱ्यांसारखा मान खाली घालून वाम मार्गाने पैसा कमवून जगू शकत नाही. कुणाच्या माना मुरगळून, कुणाला त्रास देऊन किंवा कुणाच्या भावना दुखावून दोन पैसे काढूच शकत नाही. 

जे सत्य आणि खरे आहे तेच बोलतो, लिहितो आणि वागतो. लिखाणासाठी वेळही द्यावा लागतो. तरी कृपया या सर्व बाबींचा विचार करून, लक्षात ठेवून आपल्या वैयक्तिक लिखाणासाठी संपर्क साधल्यानंतर ते मोफत किंवा अल्प दरात करून घेण्याची अपेक्षा करू नका. एवढेच नम्र निवेदन करतो, धन्यवाद.

आपलाच

*- एस.एम.युसूफ़ मुक्तपत्रकार, बीड.*

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*- एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत