Breaking News

बालक सक्षम तर देश सक्षम बनेल - समीर पठाण बाल हक्क सप्ताह निमीत्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

शिरूर कासार (एस.एम.न्युज़) - देशातला प्रत्येक बालक हा सक्षम बनला पाहिजे. बालक सक्षम बनला तर देश सक्षम बनेल असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्र चे अध्यक्ष तथा बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी केले. ते महीला व बाल विकास कार्यालय बीड, चाईल्ड लाईन बीड व ग्रामीण विकास केंद्र गोमळवाडा या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या बाल हक्क सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  

दिनांक १४ नोव्हेंबर पासुन बाल हक्क सप्ताह निमीत्त बालकांच्या हक्का विषयी विविध कायद्यांची जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास कार्यालय बीड, चाईल्ड लाईन बीड व ग्रामीण विकास केंद्र गोमळवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथील टॅलेंट हब कोचिंग क्लासेस येथे दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बाल हक्क सप्ताह निमित्त कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समीर पठाण बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, बालकांना हसत खेळत आनंद दायी शिक्षण घेता आले पाहिजे. चांगले काय, वाईट काय यातला फरक कळला पाहिजे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराच्या आहारी न जाता अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच बालकांनी पालकांचा विश्वास संपादन करून मुक्त संवादाने राहणे गरजेचे आहे. चुकीच्या अफवा, भुलथापांना प्रलोभनांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाचे शिखर गाठावे. हसत-खेळत आनंददायी शिक्षण घेतल्याने बालकांचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होतो. यामुळे बालक सक्षम बनतो.  बालक सक्षम बनला तर देश सक्षम बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईन च्या जिल्हा समन्वय अश्विनी जगताप यांनी व सुपर वायझर स्वप्नील कोकाटे, प्रविण वीर, प्रसाद पवार यांनी बाल हक्का बाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास टॅलेंट हब कोचिंग क्लासेस चे संचालक अमर खोल हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सटले यांनी केले तर आभार अमर खोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजकुमार केदार, अक्षय साळवे, आंधळे, खेडकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

=================================

*विधानसभा निवडणुक झाल्याने आता कामाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.*


१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

 २) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.


*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*वेळ - सकाळी ८ ते १० आणि रात्री १० ते ११ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत