Breaking News

बरं झालं जयदत्त क्षीरसागरांनी अर्ज मागे घेतलं होतं ते! बहुत फड़फड़ा रहा था कबूतर, लेकीन माहोल बदला नही!


बरं झालं जयदत्त क्षीरसागरांनी अर्ज मागे घेतलं होतं ते!

बहुत फड़फड़ा रहा था कबूतर, लेकीन माहोल बदला नही!

बीड (एस.एम.न्युज़) - बीड विधानसभा मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची आलेली टक्केवारी पाहून बीडवासीय जनतेतून वरील उद्गार काढले जात आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात झालेल्या एकूण मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सहा मधून परळी विधानसभा मतदारसंघ टक्केवारीच्या बाबतीत क्रमांक एक वर राहिला आहे. या मतदारसंघात ७५.२७ % मतदान झाले तर जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात मात्र मतदानाची टक्केवारी ही सर्वात निच्चांकी ठरली. या बीड मतदारसंघात ६२.१८% मतदान झाल्याचे समोर आले. यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी बीड विधानसभा मतदारसंघ मात्र मतदानाच्या टक्केवारी मध्ये सर्वात शेवटी राहिला आहे. जिल्हाभरातील सहा मतदारसंघांपैकी या मतदारसंघात सर्वात कमी मतदान होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे येथे एकाच घरातील दोन चुलत भावात थेट लढत होती. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मातब्बर पक्ष किंवा मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हते. म्हणून मतदारांना ही निवडणुकच अगदी निरस आणि एकतर्फी वाटली. यामुळेच येथे मतदानाचा टक्का घसरला. हे दोन्ही उमेदवार तीन-तीन पक्षाकडून म्हणजेच सहा पक्षातून हे दोघंच उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर यांच्यासमोर आवाहन असलेले बाकीचे सगळे तेवढ्या तोलामोलाचे नव्हते, असा गैरसमज मतदारांचा झाला म्हणून मतदारांकडून रांग लावून मतदान करण्याचे प्रमाण कमी झाल्याने मतदानाची येथील टक्केवारी जिल्हाभरातून अगदी शेवटच्या स्थानी आली. यात जर जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा अपक्ष म्हणून मैदानात राहिले असते तर मतदानाची टक्केवारी अजून जास्त घसरली असती असे बोलले जात आहे.

*जिल्ह्यातील सहाही मतदार संघात झालेल्या मतदानाची आलेली अंतिम टक्केवारी खालील प्रमाणे*

परळी ७५.२७%, आष्टी ७३.०५%, गेवराई ७५.७२%, माजलगाव ६७.२४%, केज ६३.४८%, बीड ६२.१८ तर संपूर्ण सहा मतदार संघात झालेल्या मतदानाची सरासरी एकूण टक्केवारी ही ६८.८८ अशी समोर आली आहे.

*जयदत्त क्षीरसागर सिर्फ नाम ही काफी है!*

बीड जिल्ह्यात जुन्या पिढीतील सर्वात जास्त अनुभवी आणि मातब्बर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी ते कोणत्याच पक्षात नसल्याने आणि कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी न विचारल्याने त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज इतर उमेदवारांसारखा अपक्ष उमेदवार म्हणून भरला होता. मात्र राज्यातील सहा प्रमुख पक्षापैकी तीन पक्षाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) या एका गटाकडून त्यांचे पुतणे तथा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. तर तीन पक्षाच्या दुसऱ्या गटाकडून (भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार  पक्ष) यांची दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे या दोघांसमोर कोणत्याही मातब्बर पक्षाचा दमदार उमेदवार नव्हता. जे होते त्यांच्या सोबत एकतर मातब्बर पक्ष नव्हता किंवा ते अपक्ष उभे राहिले होते म्हणून यावेळीही होणारा आमदार हा या दोन्ही क्षीरसागरांपैकीच एक असेल हे निश्चित झाल्यानंतर या दोन्ही उमेदवारांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीचा भरलेला अर्ज, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मागे घेतला होता. हे एका अर्थाने बरेच झाले. कारण बीड विधानसभा मतदारसंघात मतदानाची जी टक्केवारी घसरली ती फक्त दोन क्षीरसागरांमध्येच मुख्य लढत झाल्याने. यात पुन्हा जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून मैदानात राहिले असते तर निवडणुकीची पूर्ण रयाच गेली असती. आणि आज जो ६२.१८ हा समोर आलेला मतदानाच्या टक्केवारीचा आकडा सुद्धा बीड विधानसभा मतदारसंघात आला नसता. सहा पक्षाकडून अधिकृतरित्या दोन पुतणे आणि एक अपक्ष असे तीन क्षीरसागर मैदानात राहिले असते तर जनतेने यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मतदानाकडे पाठ फिरविली असती. आणि मतदानाची टक्केवारी यापेक्षा जास्त घसरली असती, हे नक्की. तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन बरेच केले अशी चर्चा बीड विधानसभा मतदार संघच नाही तर संपूर्ण जिल्हाभरात होऊ लागली आहे.

*कबूतर, फडफड, माहोल सारख्या शब्दांचा उपयोग झाला नाही*

तसे पाहिले तर जयदत्त क्षीरसागर हे अत्यंत मितभाषी आणि मवाळ नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहेत. परंतु या निवडणुकीवेळी वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यातला आक्रमक नेता जनतेला दिसून आला होता. त्यांनी घेतलेल्या सभांमध्ये यावेळी आक्रमक शैलीत म्हटलेला, "बहुत फड़फड़ा रहा है कबूतर लेकिन माहोल बदलने वाला है" हा संवाद मात्र त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने त्यांना खरे करून दाखविता आले नाही. म्हणून आता लोक म्हणू लागलेत की, या वयात खरे तर जयदत्त क्षीरसागर यांनी कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर शांत बसून राहायला पाहिजे होते. उगाच अपक्ष उमेदवारी दाखल करून कबूतर, फडफड, माहोल अशा शब्दांची उधळण करत स्वतःचीच फडफड दाखवून दिली आणि माहोल ही बदलला नाही. म्हणून आता बहुत फड़फड़ा रहा था कबूतर, लेकीन माहोल बदला नही असे बोलले जात आहे.

===================================

*विधानसभा निवडणुक झाल्याने आता कामाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

 २) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*वेळ - सकाळी ८ ते १० आणि रात्री १० ते ११ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत