बीडचे राजबिंडे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड सलीम खान बेलदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील अत्यंत देखणे राजबिंडे व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेले सलीम खान ममलू खान बेलदार यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड शहरातील एक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता आणि देखणे राजबिंडे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सलीम खान बेलदार हे तारुण्यापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत बांधकाम मिस्त्री म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यातही सहभाग नोंदवत होते. यापूर्वी त्यांच्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती तर काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरलेस अटॅक सुद्धा आला होता. या दोन्हीतून ते चांगले सावरले होते. दररोज शहरात पायी फिरणे, फिरत असताना सामाजिक प्रश्न दिसल्यास त्यावर कार्य करणे अशी त्यांची दिनचर्या होती. त्यांना वेगवेगळ्या टोप्यांचे संकलन करून त्या परिधान करण्याचा छंद होता. याशिवाय जॅकेट आणि शेरवानी हा त्यांचा आवडता पोशाख होता. दर शुक्रवारी वेगवेगळ्या शेरवानी किंवा जॅकेट आणि डोक्यावर रोमी टोपी घालून जेव्हा ते घरातून निघायचे तेव्हा बघणारे त्यांचे देखने रूप पाहतच राहायचे. असे राजबिंडे व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. अशा या व्यक्तिमत्वाने यापूर्वी दोन अटॅकना नामोहरम केले होते परंतु तिसऱ्यांदा आलेल्या अटॅक मध्ये मात्र 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 65 वर्षांचे होते. त्यांची नमाज़ ए जनाज़ा आज नमाज़ ए ईशा नंतर शहिंशाहवली दर्गा रोडवर असलेल्या चंदा शाह वली मस्जिद येथे पठण करण्यात आली. त्यानंतर चंदा शाह वली कब्रस्तान येथेच दफन विधी करण्यात आले. सतत हसरा चेहरा, मनमिळाऊ बोलणे, भेटलेल्या प्रत्येकाची ख्याली खुशाली विचारणारे व्यक्तिमत्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले-सुना, चार मुली-जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बेलदार कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.
=====================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा