आमदार साहेब, पाहणी व आश्वासनाला एक वर्ष पूर्ण झालं! महेदवीया दायरा कब्रस्तान अजूनही संरक्षक भिंतींच्या प्रतीक्षेत!
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या बायपास रस्त्यालगतचे महेदवीया दायरा कब्रस्तान गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षक भिंती तुटल्याने बकाल अवस्थेत गेले आहे. मात्र याकडे ना बीड नगरपालिका लक्ष देते, ना शासन, ना प्रशासन. यामुळे गेल्या वर्षी दायरा कब्रस्तान कमेटी ने विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना भेटून कब्रस्तानची सर्व दैनावस्था कथन केली होती तसेच सर्व माहितीची एक फाईल सुद्धा दिली होती. यानंतर आमदारांनी दायरा कब्रस्तानची पाहणीही केली व आश्वस्त केले होते की, लवकरच कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल. त्याला आता दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण एक वर्ष झाले आहे. दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी महेदवीया दायरा कब्रस्तानची आमदार साहेबांनी पाहणी करून आज दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण एक वर्ष झाले आहे. तरीही कब्रस्तानची दैना फिटण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काही सुरू झाले नाही.
इथे आहे हज़रत सय्यद शाह आलम यांचा जगप्रसिद्ध दर्गाह
पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तुफ़ा सल्लल्लाहू अलैही व सल्लम यांचे अनुयायी तथा क़ौम ए महेदवीया चे संस्थापक इमाम महेदी माऊद अलैही सलातुस्सलामचे पणतू हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम रहमतुल्लाह अलैह यांचा जगप्रसिध्द दर्गाह इथेच आहे. त्यांच्या ज़ियारतसाठी संपूर्ण भारतभरासह विदेशातूनही भाविक येतात.
महेदवीया दायरा कब्रस्तान इतिहासकालीन पुरातन ठेवा
बीड शहरातील शहिंंशाहवली दर्गाह कब्रस्तान नंतर महेदवीया दायरा कब्रस्तान इतर कब्रस्तानांपेक्षा पुरातन व इतिहासकालीन ठेवा आहे. महेदवीया दायरा कब्रस्ताननंतर बीड शहरात निर्माण झालेले अनेक कब्रस्तान आज सर्वसोयींनी युक्त आणि मजबूत संरक्षक भिंतींसह सुरक्षित आहेत. मात्र महेदवीया कब्रस्तानच्या दोन भिंती शहीद झाल्याने तिथून कब्रस्तान मध्ये रात्रंदिवस कुत्रे, मांजरी, बकऱ्या आदी जनावरे जात असून यामुळे कब्रस्तान मधील कबरींची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.
..... तर अजून बकाल अवस्था होईल!
महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाही तर सध्या कब्रस्तानात जात असलेले कुत्रे, मांजरी आणि बकऱ्यांसह पुढे चालून डूकरं, गाय, बैल, म्हैस सारखी मोठी जनावरेही कब्रस्तान मध्ये जायला उशीर लागणार नाही. असे जर झाले तर आजघडीला कब्रस्तानची जी बकाल अवस्था झालेली आहे त्यापेक्षा जास्त वाईट अवस्था होऊन जाईल.
कमेटीचा सातत्याने पाठपुरावा तरीही .....
महेदवीया दायरा कब्रस्तानच्या दोन्ही भिंती लवकरात लवकर बांधून द्याव्यात यासाठी महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी सातत्याने शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे याविषयी पाठपुरावा करीत आहे. परंतु अजूनपर्यंत कुणाकडूनही यासाठी ठोस कार्य करण्यात आले नाही. दस्तूरखुद्द विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनी कब्रस्तानची पाहणी करूनही पूर्ण एक वर्ष लोटला तरीही महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लागला नाही किंवा गेल्या एक वर्षाच्या काळात संरक्षक भिंतींचे बांधकाम ही सुरू करण्यात आले नाही.
.....तर लोकशाही मार्गाने आंदोलन
यानंतरही जर महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतींचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही तर महेदवीया जमाअ्त लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करेल. असा इशारा महेदवीया दायरा कब्रस्तानचे विश्वस्त तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह मुहम्मद इसाक, मुहम्मद अब्दुल रऊफ़, मुहम्मद शरीफ़, मुहम्मद इक़बाल, मुहम्मद ख़मर, मुहम्मद अन्वर, मुहम्मद शब्बीर, मुहम्मद अब्दुल गफ्फार, मुहम्मद बदरोद्दीन, पठाण अब्दुल ख़दीर खान, मुहम्मद समीर, मुहम्मद इरशाद, मुहम्मद इसा, मुहम्मद इब्राहिम, मुहम्मद इमरान, मुहम्मद नसीर, मुहम्मद वसीफ़, मुहम्मद फताउद्दीन, मुहम्मद हनीफ़, मुहम्मद नुरुद्दीन, मुहम्मद एजाज, मुहम्मद फैय्याज, मुहम्मद सैफुद्दीन, मुहम्मद मोहसीन, मुहम्मद अशपाक, मुहम्मद जुनैद, पठाण आमिर खान, पठाण सोहेल खान, मुहम्मद अफ़रोज़, मुहम्मद फ़रदीन, मुहम्मद अरख़म, मुहम्मद वासेख़, मुहम्मद लईख़ यांनी दिला आहे.
कमेटीचा आमदारांशी संपर्कच होत नाही
कमेटीचे पदाधिकारी यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा आमदारांना भेटण्यासाठी फोन लावले पण आमदार साहेब फोन काही उचलत नाही. व्हाट्सअप वर अनेकदा मेसेज टाकले तर आमदार साहेब व्हाट्सअप पाहत नाहीत. त्यांच्या स्वीय सहाय्यकांना मेसेज टाकले किंवा फोन लावले तर त्यांच्याकडूनही, हो आमदार साहेबांना किंवा भैय्यांना बोलतो असे उत्तर मिळते. आमदार मात्र काही मिळत नाही किंवा व्हाट्सअप वर मेसेज टाकल्यास तेही पाहत नाहीत.
निवडणूक आचारसंहिता लागण्यापुर्वी संरक्षक भिंतीचे काम सुरू होणे आवश्यक
आता आमदार साहेबांनी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाचे कार्य सुरू करावे. अन्यथा एकदा आचारसंहिता लागली की मग संरक्षक भिंतीचे काम सुरू होऊ शकणार नाही. याकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वैयक्तिकरित्या लक्ष देणे गरजेचे आहे.
१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा