Breaking News

सोरायसिस रोगाने जीवन जगणे असह्य झालेल्या रुग्णाला डॉ. शेख एजाज (एन.डी.) यांनी केले रोगमुक्त


बीड (एस.एम.न्युज़) - आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाला कधी कोणता रोग होईल हे सांगता येत नाही. असाच एक पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील तरुण मंगेश कांबळे याला काही वर्षांपूर्वी सोरायसिस आणि संधिवात असे दोन रोग जवळपास सोबतच जडले. यातून सुटका व्हावी म्हणून या तरुणाने गेल्या तीन वर्षात पुणे जिल्ह्यातील मोठमोठ्या तज्ञ डॉक्टरांना दाखविले. परंतु गुण काही येत नव्हता. त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. एवढा त्रास होता की, त्याला जीवन जगणे असह्य झाले होते. त्याने त्याला होत असलेल्या रोगांचा त्रास बीड येथे असलेल्या त्याच्या नातेवाईकाला बोलून दाखविला असता या नातेवाईकाने त्याला काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्वचा रोगाला डॉ. शेख एजाज यांच्याकडे दाखविले असता त्यांनी त्याला औषधोपचाराने बरे केल्याचे सांगितले. एक प्रयत्न म्हणून बीडला येऊन डॉक्टरांना दाखवून घे. असे म्हटले. यामुळे नातेवाईकाचे ऐकून मंगेश कांबळे हा तरुण बीडला येऊन डॉ. शेख एजाज यांच्या बशीरगंज  भागात असलेल्या युनिक नॅचरोपॅथी दवाखान्यात जाऊन त्यांना भेटला आणि गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही रोगामुळे त्याच्या जीवाची होत असलेली लाहीलाही व त्रास सांगितला. यावर डॉ. शेख एजाज यांनी त्याला धीर देत तुमच्या या दोन्ही रोगांवर उपचार करतो बघा शक्य तेवढे लवकरात लवकर तुमची या रोगातून मुक्तता होईल असे म्हणून त्याच्यावर उपचार केले आणि आश्चर्य उपचार सुरू करताच त्याला फरक जाणवू लागला व गेल्या वीस दिवसात त्याचे सोरायसिस हे रोग जवळपास ९०% टक्के बरे झाले आणि सांधेवात ही  जवळपास ८०% टक्के बरे झाल्याने डॉ. एजाज यांनी त्याला दिलेल्या एक महिन्याच्या उपचाराचे कालावधी पूर्ण होण्याआधी म्हणजे २० व्या दिवशीच दिनांक २८ मे रोजी बीड ला येऊन डॉक्टरांची भेट घेत पुष्पगुच्छ व पेढे देऊन त्यांचा सत्कार करून मनपूर्वक आभार व्यक्त करत आपण मला देवासारखे भेटलात असे म्हटले. आज-काल अनेक जणांच्या मनात आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी बाबत अशी शंका असते कि, या पद्धतीने उपचार घेताना रोग बरे व्हायला फार मोठा काळ लागतो मात्र डॉ. शेख एजाज यांनी नॅचरोपॅथी पद्धतीनेच मंगेश कांबळे वर केलेल्या उपचाराने २० दिवसातच रोग बरे झाल्याने जर डॉक्टरांनी योग्यप्रकारे निदान करून योग्य ते औषधोपचार रुग्णाला दिले तर पॅथी कोणतीही असो रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो. हे सोरायसिस व संधिवात सारख्या किचकट व अत्यंत त्रासदायक असणाऱ्या रोगाने त्रस्त झालेल्या मंगेश कांबळे या तरुणाला बरे करून डॉक्टर शेख एजाज यांनी दाखवून दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत