महेदवीया दायरा कब्रस्तान ची अवस्था अत्यंत वाईट ! जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणार - ॲड. शेख शफीक भाऊ
बीड (एस.एम.न्युज़) - एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी आपल्या लवाजम्यासह शहरातील मोमीनपुरा येथील महेदवीया दायरा कब्रस्तान व येथे स्थित असलेल्या हजरत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम बारा बनी स्राईल फ़ना फ़िल्ला बाक़ी बिल्ला रहेमतुल्ला अलैह यांच्या दर्गा चा दौरा केला. पाहणीत दायरा कब्रस्तान ची अवस्था पाहून त्यांनी बीड शहरात असलेल्या सर्व कब्रस्तानांमध्ये महेदवीया दायरा कब्रस्तान ची अवस्था अत्यंत वाईट दिसत असून याच्या जीर्णोद्धारासाठी आपण शक्यतो प्रयत्न करणार असे म्हटले.
या पाहणी दौऱ्या दरम्यान शफीक भाऊंनी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीकडून सविस्तर माहिती घेतली. यामध्ये मुख्यत्वे मोमीनपुरा बायपास रस्ता बनवताना महेदवीया दायरा कब्रस्तान ची बीड नगर परिषदेने बुजवलेली विहीर पुनरुज्जीवित करणे, महावितरण कडून विद्युत जोडणी करून घेणे, पश्चिम व उत्तर दिशेच्या जमीनदोस्त झालेल्या भिंतींचे बांधकाम करणे, विहीर पुनरुज्जीवित केल्यावर त्यातून कब्रस्तान मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकून घेणे. आदी ठळक बाबींवर काम करणे अतिआवश्यक असल्याचे जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष परवेज मोहम्मद, सचिव एस.एम.युसूफ़, कोषाध्यक्ष मोहम्मद आरेफ़, मोहम्मद अब्दुल गफ्फार, मोहम्मद अब्दुल खदीर, शेख खालेद, नजीर मोहम्मद, शेख नसीर, अर्शद मोहम्मद यांनी महेदवीया दायरा कब्रस्तान च्या सद्यस्थितीबाबत व आगामी काळात कब्रस्तान साठी करावे लागणाऱ्या आवश्यक कामाची माहिती शफीक भाऊंना दिली. तसेच प्रसार माध्यमाद्वारे महेदवीया दायरा कब्रस्तान च्या बातमीची दखल घेऊन भाऊंनी वेळ काढून पाहणी दौरा केल्याबद्दल कमेटी ने आभार व्यक्त केले.
यावेळी ॲड. शेख शफीक भाऊंसह पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख एजाज खन्ना भैय्या, शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, न.से. अजहर मोमीन, युवा नेते सय्यद सैफ अली लालू भैय्या, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर, युवक शहराध्यक्ष शेख सलमान, उपाध्यक्ष जुबेर पठाण, सय्यद परवेज, मुजम्मिल मोमीन आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़
आसेफनगर, बीड.
मो:- 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा