राजुरीवेस ते बलभीम चौक, बलभीम चौक ते माळीवेस चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण उन्हाळी हंगामात करा ! एस.एम.न्युज़ कडून जनहितार्थ मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील राजुरीवेस ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण उन्हाळी हंगामात करण्यात यावे. अशी मागणी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील राजुरीवेस ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. तर काही वेळा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांची आपसात धडक होते किंवा पादचाऱ्यांना टक्कर लागते. बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात या रस्त्यावर मास्टर प्लान ची अंमलबजावणी करत रस्ता रुंद करून घेतला होता नंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याला आता बरीच वर्षे उलटली असून मास्टर प्लान नंतर करण्यात आलेल्या रस्त्याला तेव्हापासून आतापर्यंत पडलेल्या खड्ड्यांचे डागडुजीकरण सुद्धा करण्यात आले नसल्याने आजमीतिला या रस्त्यावर अतिशय मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय हा रस्ता डांबरीकरणाने बनविलेला असल्याने या रस्त्यावरील काही भागात विशेषतः ऐतिहासिक कारंजा टॉवर परिसरात जिथे नळाचे पाणी साचत असते तिथे नेहमी हमखास खड्डे पडतात. ही बाब लक्षात घेता आता या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकरिता डांबरीकरणाची डागडुजी उपयोगाची नाही. याकडे लक्ष देऊन सुरु होत झालेल्या उन्हाळी हंगामात राजुरीवेस ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौकापर्यंत च्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्यसंपादक - एस.एम.न्यूज़
आसेफ़नगर, बीड.
मो - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा