भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद व फ़ातिमा शेख यांची नावे वगळली ! मौलाना आझाद विचार मंचने केली नावे समाविष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फ़ातिमा शेख यांची नावे महाराष्ट्र शासनाने "थोर व्यक्ती राष्ट्रीय दिन" च्या यादीतून वगळली असल्याने याविरोधात मौलाना आझाद विचार मंचने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, अल्पसंख्यांक मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून या दोन्ही थोर व महान व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट करून यादी पुनः प्रसिद्ध करावी. तसेच या दोन्ही थोर व महान व्यक्तींची नावे वगळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनातर्फे "राष्ट्रीय महापुरुष थोर व्यक्ती राष्ट्रीय दिन" संदर्भात ३१/१२/२०२१ एक जी.आर क्र. २०२११२३११४४९५६९२०७ www govin या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या जी.आर. मध्ये "थोर व्यक्ती राष्ट्रीय दिन" च्या यादीमध्ये स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद व फ़ातिमा शेख यांची नावे वगळण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. तरी "थोर व्यक्ती राष्ट्रीय दिन" या यादीत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद व फ़ातिमा शेख यांची नावे समाविष्ट करून यादी पुनः प्रसिद्ध करावी. तसेच ज्या अधिकारी ने मौलाना आज़ाद व फ़ातिमा शेख यांची नावे जाणीवपूर्वक वगळण्याचे पाप करून थोर स्वतंत्रता सेनानी मौलाना आज़ाद व सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फ़ातिमा शेख यांचा अपमान करण्याचे पाप केले आहे त्याची सखोल चौकशी करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, अल्पसंख्यांक मंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने करण्यात आली असून निवेदनावर काज़ी मुजीब उर रहमान, अर्शद सिद्दिकी, शेख अब्दुल रशीद, पठाण अय्युब खान, सय्यद हसीन अख्तर, मुज्तबा अहेमद खान, शेख अखील, काज़ी आमेर, शेख मोहसीन, अतीक़ अहेमद खान यांची नावे व सह्या आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़ वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनल, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा