"त्या" वाहकाची रस्त्यावर ही फरफट;पण इच्छा तिथे मार्ग !
बीड (एस.एम.न्युज़) - एस.टी. महामंडळाच्या क र्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक चणचण उभी राहिल्याने धारूर आगारातील वाहक नेटके बाबासाहेब रामकिशन यांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर बसून त्यांचा पारंपारिक व्यवसाय शहरातील आडत मार्केट रोड वर बसून चप्पल, बूट रिपेरिंग व पॉलिश करून दोन पैसे कमवावे या हेतूने आपलं छोटसं दुकान थाटलं. परंतु रस्त्यावर ते ज्या ठिकाणी बसले होते त्याच रस्त्यावर समोरील बाजूस तोच व्यवसाय करणारा त्यांच्याच समाजातील एक व्यवसायिक पूर्वीपासूनच हा उद्योग करीत आहे. वाहक नेटके यांनी त्याच व्यवसायिका समोरील जागेत बसून उद्योग सुरू केल्याने त्यांनी तिथे बसून आपल्या पोटावर पाय देऊ नये अशी विनंती सदरील व्यावसायिकाने केली. यामुळे वाहक नेटके यांनी पहिला दिवस कसातरी तिथे काढला आणि दिवसभरात दोनेकशे रुपये कमविले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी शहरात दुसरी नवीन जागा भेटते का ? याची चाचपणी करण्याकरिता शहरात फिरले आणि त्यांना जिल्हा न्यायालयाच्या कोपऱ्यावर जागा मिळाली. या नवीन जागी ते ८ डिसेंबर पासून उद्योग करू लागले आहेत. संध्याकाळी जेव्हा फेरफटका मारताना त्यांच्यावर नजर पडली तर जागा बदली चे कारण विचारले असता वाहक नेटके यांनी वरील प्रकार सांगितला. तसेच प्रसन्न होऊन सांगितले की, आडत मार्केट रोड पेक्षा येथे चांगला धंदा जमला भाऊ. दिवसभरात जवळपास चार-पाचशे रुपयापर्यंत पैसे जमले. अशी माहिती वाहक नेटके यांची प्रथमच माहिती घेऊन प्रसिद्धी माध्यमातून त्यांच्यासह एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक ताणाताण व ससेहोलपट समाजासमोर आणली. जीवन जगताना संकटे येतच राहतात परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहिल्यास आणि दृढ इच्छा शक्ती असल्यास निश्चितपणे मार्ग सापडतोच सापडतो. वाहक नेटके यांची आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवण्यासाठी मेहनत करण्याची व व्यवसाय करण्याची इच्छा दृढ असल्याने त्यांना दुसऱ्याच दिवशी शहरातच दुसरी चांगली जागा मिळाली.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक (एस.एम.न्युज़)
मो.- 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा