कपिलधार तिर्थक्षेत्राच्या १०० कोटी विकास आरखड्याचे पुण्य घेणाऱ्या आ. संदिप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेचे २२ रस्ते अडवणुकीचे पापही घ्यावे - डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड (एस.एम.न्युज) - कपिलधार तिर्थक्षेत्राच्या १०० कोटी विकास आरखड्याचे पुण्य घेणाऱ्या आ. संदिप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेचे २२ रस्ते अडवणुकीचे पापही घ्यावे असा टोला डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलेल्या निवेदनातून लगावला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आ.संदिप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कपिलधार तिर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी रूपयांचा विकास आराखडा नव्याने सादर करण्याचे प्रशासनाला आदेश देऊन श्रेय घेऊन पुण्य कमावले परंतु याच आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड शहरातील मुख्य २२ रस्त्यांची जिल्हाधिकारी बीड यांना तक्रार करून रस्तेकामास स्थगिती आणली आहे, त्यामुळेच आ.संदिप क्षीरसागर आणि डाॅ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या राजकीय श्रेयवादातुन बीड मधिल नागरीकांना मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. आ. संदिप क्षीरसागर व डाॅ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या श्रेयवादातुन बीड शहरातील मुख्य २२ रस्तेकामांना मिळालेली स्थगिती उठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांना देऊन तात्काळ रस्तेकाम पुर्ण करण्यात यावेत. यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मुहम्मद मोईज्जोद्दीन, सय्यद आबेद, शेख मुबीन यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा