Breaking News

डॉ.ओंकार माने याचे एफ.एम.जी.ई.परीक्षेत घवघवीत यश


बीड(एस.एम.न्युज़) - नॅशनल एक्झामिनेशन बोर्ड नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक 18 जून 2021 रोजी घेण्यात आलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत डॉ.ओंकार माने याने प्रथम प्रयत्नात घवघवीत यश प्राप्त केले. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कमिशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत यश प्राप्त केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यास भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळत नाही. विशेष म्हणजे या परीक्षेत डॉ.ओंकार माने याने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश प्राप्त केले. डॉ.ओकार माने याने नॉर्थ स्विच ऑन विद्यापीठ, चीन या देशात एम.बी.बी.एस.चे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. या यशानंतर डॉ.ओंकार याने एफ.एम. जी.ई.ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. या यशाबद्दल चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.घाडगे व परिवाराने त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ.ओंकार चे आई-वडील श्री.व सौ.माने उपस्थित होते.डॉ ओंकारने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे मित्र,नातेवाईक व हितचिंतकाकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत