अरशान व इक़रा यांचा आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण
बीड (एस.एम.न्युज़) - नऊ वर्षाचा अरशान आणि सात वर्षाची इक़रा या दोघा भाऊ-बहिणीने आपआपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा यशस्वीरित्या पूर्ण केला.
सध्या पवित्र रमज़ान महिन्याचे रोजे अंतिम टप्प्यात आले असून येत्या १४ मे शुक्रवार रोजी सर्व मुस्लिम बांधव इस्लाम धर्माची सर्वात मोठी व पवित्र रमज़ान ईद साजरी करणार आहेत. तत्पूर्वी मात्र उन्हाळा तप्त आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. यामुळे तरुण आणि वयस्क रोज़ेदार सुद्धा उन्हाने घायाळ होत आहे. अशा अवस्थेमध्ये शेख अरशान अलताफ़ आणि शेख इक़रा अलताफ़ या दोघा भाऊ-बहिणीने आपआपल्या आयुष्याचा पहिला रोज़ा यशस्वीरित्या पूर्ण केला. याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असून आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकु, मामा-मामी, आत्या-मामा, भाऊ-बहिण यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
--------------------------
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक- एस.एम.न्युज़,
आसेफ़ नगर, बीड़.
संपर्क- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा