Breaking News

जिल्ह्यातील सर्व तालुके,गावांसह बीड शहराच्या प्रत्येक प्रभागात भाजीपाला विक्रीस परवानगी द्या - एस.एम.युसूफ़


बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील सर्व तालुके,गावांसह बीड शहराच्या प्रत्येक प्रभागात भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात यावी. अशी मागणी आपले सरकार या वेबपोर्टल द्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, बीड शहरासह जिल्हाभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबरहुकूम लावण्यात आलेल्या कडक लॉक डाऊन मुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच खाणाऱ्या जनतेची पार गोची होऊन गेली आहे. एक तर शासन-प्रशासनकर्त्यांकडून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला लॉक डाऊन  साडेसातीच्या या काळात भरण-पोषण करण्याकरिता एक छदामही मिळत नाही. जनता आपल्या स्तरावर कसेतरी दिवस काढत आहे. त्यातही शासन-प्रशासनकर्ते वेगवेगळे नियम लावून सर्वसामान्यांचे जगणे दुभर करीत आहेत.शेतकरी वर्ग उन्हातानात राब-राब राबून शक्य होईल तो भाजीपाला पिकवून शहरात आणून विकतात परंतु लॉक डाऊन मध्ये अन्य बाबींसह भाजीपाला विक्रीसही बंदी घातल्याने मोठ्या मेहनतीने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विकावा तरी कुठे ? त्यांनी प्रपंच चालवावा तरी कसा ? याचा विचार ना शासन करीत आहे ना जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी करीत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्यास जर बाजारपेठच उपलब्ध करून दिली नाही तर भाजीपाला शेतातच नासून किंवा सुकून जाईल. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल होऊन नुकसान होईलच परंतु जनतेला खायला सुद्धा मिळणार नाही. तरी  शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला भाजीपाला वेळेवर विकला जावा आणि जनतेला ही खायला मिळावा ही बाब लक्षात घेऊन  जिल्हाभरातील सर्व तालुके, सर्व गावांसह बीड शहराच्या प्रत्येक प्रभागात एका जागी उभे राहून भाजीपाला विक्रीस परवानगी द्यावी. आणि शेतकऱ्यांसह जनतेचे होत असलेले हाल थांबवावे. अशी मागणी आपले सरकार या वेबपोर्टल द्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.
एस.एम.युसूफ़(मुख्य संपादक)
एस.एम.न्युज़, आसेफ़नगर,बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत