Breaking News

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दैनंदिन सुविधा द्या किंवा पर्यायी व्यवस्था करणाऱ्यांना परवानगी द्या - एस.एम.युसूफ़

बीड (एस.एम.न्युज़) -जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दैनंदिन सुविधा द्या किंवा पर्यायी व्यवस्था करणाऱ्यांना परवानगी द्या. अशी मागणी आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून  केली आहे.
        निवेदनात नमूद केले आहे कि, कोरोना पॉझिटिव्ह निघत असलेल्या रूग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात येत आहे.कोरोना चा प्रकोप वाढल्याने ज्यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली त्या घरातील एका ऐवजी दोन-तीन लोक रुग्णांच्या काळजीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस लाईन चे गार्डन तसेच सहन जागेमध्ये सुद्धा जागा मिळेल तिथे मोठ्या काळजीने थांबत असलेले दिसून येत आहे.यामध्ये बीड शहर वगळता ग्रामीण भागातून येणार्‍यांची संख्या अधिक आहे.जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्ण व एखाद्या माणसाला चहा, नाश्ता, जेवण वगैरे रूग्णालयात देण्यात येते. परंतु रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय परिसरासह इतर ठिकाणी रुग्णाच्या चिंतेने ताटकळत दिवस काढत आहे.त्यांच्यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सोयीसुविधा करण्यात आलेली नाही.शिवाय जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कडक लॉक डाऊन मुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना आपली भूक शमविण्यासाठी काहीही मिळत नाही. जिल्हा रुग्णालय परिसरातील हातगाड्यांवर लहान-सहान दुकान थाटून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक असलेले गरम पाणी, चहा, नाश्ता, जेवण इत्यादी सेवा अल्पदरात देणार्‍यांचे उद्योगही बंद करण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडून किंवा आरोग्य प्रशासनामार्फत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा गरम पाणी, चहा, नाश्ता, जेवण, कॉफी, ज्यूस आदी चोवीस तास उपलब्ध करून देण्याची सोय करावी किंवा जिल्हा रुग्णालय परिसरात या सर्व सेवा देणाऱ्या हात गाड्यांवरील लहान-सहान उद्योग करणाऱ्यांना निदान जिल्हा रुग्णालय परिसरात तरी आपापले उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देऊन होत असलेली गैरसोय दूर करावी. अशी मागणी आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे  जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
एस.एम.युसूफ़(मुख्य संपादक)
एस.एम.न्युज़,आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत